नगरमध्ये अन्नकोट उत्सव जल्लोषात साजरा

सामना ऑनलाईन, नगर 

नवीपेठ येथे असणारे पुरातन श्रीराम मंदिरात अन्नकोट उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.  श्रीराम भक्त हनुमान सत्संग मंडळ व मंदिराचे पुजारी सत्यनारायण खंडेलवाल यांचे वतीने या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. बुधवार दि.१४ नोव्हेंबरला या उत्सवाची सुरुवात झाली. गिरीधारी गोवर्धन पर्वताची विधीवत पूजा करुन भगवान श्रीकृष्णाला ५६ भोग नैवेद्य दाखवण्यात आला. यानंतर शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.