पालिका कर्मचारी, लिपिक लाच घेताना ट्रॅप

प्रातिनिधिक

सामना प्रतिनिधी, मुंबई

वडिलांच्या बाकी असलेल्या पेन्शनचे काम करून देण्यासाठी राहुल (नाव बदललेले) यांच्याकडे पाच हजारांची लाच मागून ती घेताना पालिकेच्या कुलाबा येथील घनकचरा कार्यालयातील कर्मचारी बाळू रेड्डी (४२) आणि लिपिक प्रवीण क्षोत्रीय (५७) या दोघांना अॅण्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

राहुल यांचे वडील मृत झाले असून त्यांच्या बाकी असलेल्या पेन्शनच्या कामासाठी ते रेड्डी याला भेटले होते. तेव्हा क्षोत्रीय याच्याशी संगनमत करून रेड्डीने राहुल यांच्याकडे पाच हजारांची लाच मागितली होती.