या मुलीच्या डोळ्यातून चक्क मुंग्या निघतात

सामना ऑनलाईन । संभाजीनगर

गोड पदार्थांना लागणाऱ्या मुंग्या आपल्याला हैराण करतात. एकामागोमाग एक लागलेली ही मुंग्यांची रांग काही केल्या संपतच नाही. साखरेच्या डब्याभोवती फिरणाऱ्या मुंग्या तुम्ही पाहिल्या असतील पण कुणाच्या डोळ्यातून मेलेल्या मुंग्या पडताना तुम्ही पाहिल्या आहेत का…? विश्वास बसत नाही ना…पण ही सत्य घटना आहे. दक्षिण कन्नड जिह्यातील एका गावात अश्विनी नावाची ११ वर्षांची मुलगी राहते. ही मुलगी नलिनगिरी या शाळेत इयत्ता पाचवीमध्ये शिकत असून गेल्या १० दिवसांपासून तिच्या डोळ्यातून मेलेली मुंगी बाहेर येत आहे. आतापर्यंत या मुलीच्या डोळ्यातून तब्बल ६० मेलेल्या मुंग्या बाहेर आल्या आहेत. या अशा विचित्र आजारामुळे ही मुलगी त्रस्त झाली असून डॉक्टरदेखील हैराण झाले आहेत.