सहजीवनी या : अनुजा खटावकर सदा हसतमुख

 • मचा जोडीदार : अरुण खटावकर
 • लग्नाचा वाढदिवस : 16 डिसेंबर 1987
 • त्यांचे दोन शब्दांत कौतुक : हसतमुख, हजरजबाबी
 • त्यांचा आवडता पदार्थ : मिसळ
 • स्वभावाचे वैशिष्ट्य : खट्याळ, लिहिण्याची आवड
 • एखादा त्यांच्याच हातचा पदार्थ : चहा
 • वैतागतात तेव्हा : काही वेळ बोलत नाहीत
 • त्यांच्यातील कला : पत्रलेखन आणि कविता वरणे
 • त्यांच्यासाठी गाण्याची ओळ : जीवनात ही घडी अशीच राहू दे
 • भूतकाळात जगायचे तर : मुलाचा जन्म झाल्यावर त्यांचा आनंद.
 • तुम्हाला जोडणारा भावबंध : आमचा मुलगा अक्षय
 • आयुष्यात सांगायची राहिलेली गोष्ट : आम्ही गेली 31 वर्षे एकमेकांच्या विचाराने सुखी संसार करीत आहोत. नेहमी तुम्ही माझ्या सर्व इच्छा पूर्ण केल्या आहेत. तुमच्यासारखा हसतमुख, कॉमेडी जोडीदार मिळाला हे माझे भाग्य. आमची जोडी अशीच राहू दे. 

आपला जोडीदार… त्याची अनेक वर्षांची मोलाची साथ. अनेक गोड, तिखट आठवणींना उजाळा देणारं… आणि पती-पत्नी या नात्यातील भावबंध दृढ वरणारं सदर… आपणही आपल्या जगण्यातील मान्यवरच असतो. तेव्हा जोडीदाराविषयीच्या नाजूक भावना मांडा छायाचित्रासहित या सदरामध्ये… या प्रश्नांच्या चौकटीत… सुंदर, तरल भावनांना प्रसिद्धी दिली जाईल.

आमचा पत्ता : आनंदाचं झाड, शेवटचे पान, दै. ‘सामना’, सद्गुरू दर्शन, नागू सयाजी वाडी, दै. ‘सामना’ मार्ग, प्रभादेवी, मुंबई-400025 किंवा [email protected] वरही पाठवता येईल.