‘देवसेना’मुळे अजय देवगन, अक्षय कुमारला मिळाले ‘हे’ सुपरहिट सिनेमे

सामना ऑनलाईन । मुंबई
हिंदुस्थानी सिनेसृष्टीत माईलस्टोन ठरलेला ‘बाहुबली’ सिनेमांत देवसेनेची भूमिका साकारलेली अभिनेत्री अनुष्का शेट्टी आज ३६ वर्षांची झाली आहे. साऊथमध्ये अनुष्काने अनेक हिट सिनेमे दिले आहेत. तिच्या काही सिनेमांचा बॉलिवूडमध्ये रिमेकही करण्यात आलं. मात्र त्यातील दोन सिनेमे असे आहेत ज्यामध्ये बॉलिवूडच्या ‘सिंघम’ आणि ‘खिलाडी’ने भूमिका साकारल्या आहेत.
अजय देवगनच्या करिअरमधील सर्वात हिट सिनेमांपैकी एक सिनेमा म्हणजे २०११ साली आलेला सिंघम. हा सिनेमा त्यातील जबरदस्त डायलॉग आणि अॅक्शनमुळे सुपरहिट झाला होता. सिंघम सिनेमा २०१० साली आलेल्या तमीळ सिनेमाचा रिमेक आहे. या सिनेमात अनुष्का शेट्टी आणि सूर्या मुख्य भूमिकेत होते.
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा २०१२ साली आलेला ‘राऊडी राठोर’ देखील तेलगू सिनेमा ‘विक्रमार्कुडु’चा रिमेक आहे. ‘विक्रमार्कुडु’ एस.एस. राजामौनी दिग्दर्शित केला होता. तर या सिनेमातही अनुष्का शेट्टी प्रमुख भूमिकेत होती. त्यामुळे अनुष्का शेट्टीचं अक्षय कुमार आणि अजय देवगनच्या करिअरमध्ये मोठं योगदान आहे.