Lok sabha 2019 भाजप-अपना दलमध्ये आघाडी, जागावाटपाचा तिढा सुटला

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

उत्तर प्रदेशमध्ये सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि अपना दलमध्ये दिलजमाई झाली असून दोघांनी आगामी लोकसभा निवडणूक एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही पक्षांमध्ये काही काळापासून राजकीय ओढाताण सुरू होती. परंतु शुक्रवारी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी अपना दलसोबत सर्व काही सुरळीत असल्याचे म्हणत आघाडी केल्याचे जाहीर केले. तसेच जागावाटपाचा तिढाही सुटल्याचे यावेळी सांगण्यात आले. उत्तर प्रदेशमध्ये अपना दल दोन जागा लढवणार आहे. 2014 मध्ये देखील दोन्ही पक्ष एकत्र लढले होते.

शुक्रवारी अपना दलाच्या नेत्या अनुप्रिया पटेल आणि अमित शहा यांच्यामध्ये बैठक पार पडली. या बैठकीमध्ये दोन्ही पक्षांनी एकत्र लढण्याचा निर्णय घेतला. यानंतर अमित शहा यांनी केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल या मिरजापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील हे जाहीर केले. तसेच दुसऱ्या जागेबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याचेही ते म्हणाले.

amit-shah-new

2014 मध्ये अनुप्रिया पटेल यांच्या अपना दल पक्षाने दोन जागांवर विजय मिळवला होता. यात मिरजापूर येथून स्वत: अनुप्रिया पटेल तर प्रतापगढ मतदारसंघातून कुंवर हरिवंश सिंह निवडून आले होते. निवडणूक जिकल्यानंतर पटेल यांना केंद्रामध्ये आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागात राज्यमंत्रीपद देण्यात आले होते. परंतु 2017 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर अपना दल आणि भाजपमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली होती.

उत्तर प्रदेशमध्ये ‘आयाराम’ नाही तर योगींचे मंत्री उतरणार निवडणुकीच्या रिंगणात?

…म्हणून झाल्या नाराज
अनुप्रिया पटेल यांचे पटील आशिष पटेल यांनी भाजप अपना दलकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला होता. तसेच सरकारी कार्यक्रमात आपल्याला आमंत्रित केले जात नसल्याचा आरोप अनुप्रिया पटेल यांनी केला होता. यानंतर त्यांनी सरकारी कार्यक्रमावर बहिष्कारही टाकला होता. भाजपला सोडून अनुप्रिया पटेल महाआघाडीत सहभागी होणार असल्याची चर्चा होती. परंतु आता दोन्ही पक्षांमध्ये आघाडी झाल्याने सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

lok sabha 2019 – उत्तर प्रदेशची वाट बिकट