तरुणांमध्ये तुफान फेमस झालेल्या ‘शेवंताची’ निवड कशी झाली, माहिती आहे?

9

सामना ऑनलाईन । मुंबई

सध्या ‘रात्रीस खेळ चाले’ ही मालिका एका रंगतदार वळणावर आली आहे. या मालिकेत शेवंताची एंट्री झाली असून तिच्यामुळे या मालिकेची लोकप्रियता आणखी वाढली आहे. मालिकेत जसे अण्णा शेवंतावर लट्टू झालेले दाखवले आहेत तशीच तरुणाई देखील शेवंताच्या किलर लूकवर फिदा झाली आहे. ही शेवंता नक्की कोण हे शोधण्यात अनेकजण गुंतले आहेत, तिचे फोटो सोशल मीडियावर फिरत आहेत. आज ज्या सोशल मीडियावर तिचे फोटो व्हायरल होत आहेत त्याच सोशल मीडियावरून शेवंता म्हणजे अपूर्वा नेमळेकर हिला तिचा अभिनयाचा पहिला ब्रेक मिळाला होता. फेसबुकवरील अपूर्वाचे फोटो बघूनच तिची झी मराठीवरील ‘आभास हा’ या मालिकेसाठी निवड करण्यात आली होती.

अण्णांची शेवंता नेमकी आहे तरी कोण? पाहा फोटो गॅलरी

सर्व सामान्यांसारखे आयुष्य जगणारी अपूर्वा एचडीएफसी बँकेत कामाला होती. तिने फेसबुकवर तिचे काही फोटो अपलोड केले होते. ते फोटो दिग्दर्शिका रसिका नामजोशी यांनी पाहिले व त्याचवेळी रसिका त्यांना आवडली. त्यांनी अपूर्वाशी संपर्क साधत तिला ‘आभास हा’ या मालिकेसाठी ऑडिशन द्यायला सांगितले. त्यात अपूर्वाची निवडही झाली. त्यानंतर अपूर्वाने मागे वळून पाहिले नाही. ‘आभास हा’ या मालिकेत तिने चैतन्य चंद्रात्रे, लोकेश गुप्ते, सुचित्रा बांदेकर अशा मोठ्या कलाकारांसोबत काम केलं. ही मालिका संपल्यानंतर तिने स्टार प्रवाहवरील आराधना, एका जोडीचा मामला व तू जिवाला गुंतवावे या मालिकांमध्ये तसेच विला, भाखरखाडी सात किलोमीटर, इश्कवाला लव्ह या चित्रपटांमध्ये काम केले.