ISSF World Cup : हिंदुस्थानच्या अपूर्वीचा विश्वविक्रम, नेमबाजीत सुवर्णपदकाचा वेध

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

नवी दिल्लीमध्ये आजपासून सुरू झालेल्या नेमबाजी वर्ल्डकप (ISSF) मध्ये हिंदुस्थानने घडाकेबाज सुरुवात केली आहे. महिलांच्या 10 मिटर एअर रायफल प्रकारामध्ये हिंदुस्थानच्या अपुर्वी चंदेलाना विश्वविक्रमासह सुवर्णपदकावर निशाणा साधला. अपूर्वीने 252.9 अंकांसह सुवर्णपदकावर नाव कोरले.

वर्ल्डकपमध्ये महिलांच्या 10 मिटर एअर रायफल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी अपूर्वी अंजली भागवतनंतर फक्त दुसरी महिला आहे. अपूर्वी चंदेलाचे हे वर्लडकपमधील वैयक्तीक तिसरे पदक आहे. यापूर्वी अपूर्वीने 2015 ला आयएसएसएफ वर्ल्डकपमध्ये रौप्य पदक जिंकले होते, तसेच 2014 मध्ये झालेल्या ग्लासगो कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक आणि 2018 मध्ये झालेल्या गोल्डकोस्ट कॉमनवेल्थ गेम्समध्ये कांस्यपदक जिंकले होते. तसेच 2018 ला जकार्तामध्ये झालेल्या आशियन गेम्समध्ये रवि कुमारसोबत मिळून तिने मिक्स प्रकारात कांस्यपदकावर मोहोर उमटवली होती.

ऑलिम्पिकवर असणार नजर
अपूर्वीची नजर आता ऑलिम्पिक पदकावर असणार आहे. गेल्या वर्षा सप्टेंबरमध्ये अपूर्वी आणि अंजुम मोद्गिलने 2020 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेचे तिकीट मिळवलो होते.