लष्करासाठी 3 हजार कोटींची शस्त्रास्त्र खरेदी करण्यास मंजुरी

3

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

लष्करासाठी 3 हजार कोटी रुपयांची शस्त्रास्त्र खरेदी करण्यास संरक्षण मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. ब्राह्मोस सुपरसॉनिक क्रुझ क्षेपणास्त्रांसाठी दोन स्टेल्थ फ्रिगेट (आरमारी जहाज) आणि लष्कराच्या अर्जुन रणगाड्यासाठी एआरव्ही गाड्या विकत घेण्यात येणार आहेत. आर्मर्ड रिकव्हरी व्हेइकल अर्थात एआरव्ही विकसित करण्याचे आणि त्याचे डिझाइन करण्याचे काम डीआरडीओने केलेले आहे. या गाडय़ांचे उत्पादन संरक्षण क्षेत्रातील सार्वजनिक कंपनी बीईएमएलमार्फत होणार आहे. सुमारे 1 अब्ज डॉलर्स मोजून नौदलासाठी रशियाकडून दोन स्टेल्थ फ्रिगेट खरेदी करण्यात येणार आहेत.