लष्कराचा जवान बनला दहशतवादी; पोलिसांचा संशय

सामना ऑनलाईन । जम्मू-कश्मीर

जम्मू-कश्मीरमधील लष्कराचा एक जवान दहशतवादी संघटनेत सहभागी झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मीर इदरीस सुल्तान असं या जवानाचं नाव आहे. मीर काही दिवसांपासून बेपत्ता होता, त्यानंतर त्याचा एक बंदूक हातात घेतलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावरून तो दहशतवादी संघटनेत सहभागी झाला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मीर ‘हिजबूल मुजाहिद्दीन’ या दहशवादी संघटनेत सामील झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मीर लष्कराच्या बिहार-१२ जकली तुकडीत कार्यरत आहे. गेल्या आठवड्यात गुरूवारी तो आपल्या घरी शोपियान येथे आला होता. तेथून तो गायब झाला. मीरसोबत शोपियानमधील दोन नागरीकही बेपत्ता झाले आहे. मीर या दोघांसोबत हिजबूल मुजाहिद्दीन दहशतवादी संघटनेत सामील झाला असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

लष्कराकडून स्पष्टीकरण नाही
लष्काराने याबाबत सांगितले की, मीर बेपत्ता आहे आणि मात्र तो दहशतवादी संघटनेत सहभागी झाला आहे का? याबाबत कोणतीही माहिती अद्याप मिळालेली नाही. याशिवाय मीर सध्या झारखंड येते कार्यरत होता आणि यावरून तो नाराज होता.