जवानाच्या पत्नीवर बलात्कार, बनवला अश्लील व्हिडिओ

सामना ऑनलाईन। पाटणा

बिहारमधील भोजपूर जिल्ह्यातील कोईलवार येथे एका नराधमाने जवानाच्या पत्नीवर बलात्कार करून तिचा अश्लील व्हिडीओ बनवला. त्यानंतर तिला ब्लॅकमेल केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. रोज रोजच्या या जाचाला कंटाळल्याने पीडितेने पतीला याबदद्ल सांगितले. पतीने पोलिसात याबदद्ल तक्रार दाखल केली. त्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. कुमार असे आरोपीचे नाव असून तो फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

कुमार हा पीडितेच्या घराजवळ राहत असून तिचा पती जवान असल्याचे त्याला कळाले होते. तेव्हापासून तो तिच्या मागावर होता. घरात महिला एकटीच राहत होती. हे कुमारने हेरले होते. एके दिवशी अचानक त्याने महिलेच्या घरात प्रवेश केला. ती एकटीच असल्याचे बघून त्याने तिच्यावर बलात्कार केला .तसेच मोबाईलमध्ये या घटनेचा व्हिडिओही त्याने काढला.

या घटनेमुळे पीडितेला मानसिक धक्का बसला होता. हेच हेरुन कुमारने तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. तो तिच्याकडून पैसे उकळू लागला व लैंगिक अत्याचारही करू लागला. भीतीमुळे पीडितेने याबदद्ल कोणासही काही सांगितले नाही. पण पती घरी आल्यावर मात्र त्याला तिच्यातील बदल जाणवला. त्याने तिला विश्वासात घेऊन विचारले. त्यावर पीडितेने पतीला कुमारबदद्ल सांगितले. त्यानंतर पतीने पोलिसांत कुमार विरोधात तक्रार दाखल केली. याबदद्ल कळताच कुमारने तिथून पळ काढला.

summary-army-man-wife-raped-accused-made-objectionable-video-blackmail