लष्कर मुंबईत तीन पूल बांधणार

सामना ऑनलाईन । पुणे

केवळ एलफिन्स्टनच नव्हे तर मुंबईत आणखी दोन रेल्वे स्थानकांवरील पूल आम्ही बांधणार आहोत, अशी माहिती लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी आज दिली. राष्ट्र उभारणीत व राष्ट्रीयत्वात सैनिकांच्या त्यागाची समाजाला जाणीव व्हावी यासाठी त्यांच्या वीरगाथांचा समावेश ‘सीबीएससी’च्या अभ्यासक्रमात व्हावा यासाठी आम्ही प्रयत्नशील असून पुढील वर्षी त्याचा अभ्यासक्रमात समावेश होईल, असेही ते म्हणाले.