धक्कादायक! विद्यार्थिंनींना विवस्त्र करून तपासली मासिक पाळी?

8

सामना ऑनलाईन । मुझफ्फरनगर

मुझफ्फरनगर येथील विद्यार्थिंनींसाठीच्या एका हॉस्टेलमध्ये वॉर्डनने घृणास्पद कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे. या वॉर्डनने ७० विद्यार्थिनींना त्यांच्या मासिक पाळी दरम्यान विवस्त्र करून रक्ताची तपासणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या कथित प्रकरणी वॉर्डनला तात्काळ निलंबित करण्यात आले आहे.

अनेक विद्यार्थिनींना या घटनेचा धसका घेतला आहे. त्यांनी वॉर्डन विरोधात अत्यंत कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी केली.

मुझफ्फरनगरमधील या घटनेवर राज्य सरकारचे मंत्री श्रीकांत शर्मा यांनी प्रतिक्रिया देताना हा प्रकार गंभीर असून त्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना तपासाचे आदेश देण्यात आल्याचे सांगितले. तसेच दोषींच्या विरोधात कडक कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले.

दरम्यान, बाथरूममध्ये रक्त पाहिल्याने मला मुलींची चिंता वाटली, म्हणून मी तपासणी केली. सगळं ठिक आहे का हे पाहण्यासाठी मी तपासणी केली. पण चुकीचे कृत्य केलेले नाही. उलट विद्यार्थिनींनी अभ्यासात लक्ष द्यावं म्हणून मी त्यांच्यावर लक्ष ठेवून असते. त्याच्याच राग आल्याने कुणी तरी विद्यार्थिनींना भडकवले आहे, असे आरोपी वॉर्डनने सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या