अर्पित, रुणालीची महाराष्ट्राच्या कबड्डी संघात निवड

सामना ऑनलाईन । मुंबई

अर्पित अनिल लकेश्री व रुणाली प्रशांत भुवड यांची झारखंड येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी (किशोर गट) महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. अर्पित हा विक्रोळी येथील नवरत्न मंडळाचा खेळाडू असून शशिकांत कदम, श्रीकांत घावरे, सुनील लकेश्री, सुनील तांबे यांचे मोलाचे मार्गदर्शन त्याला लाभत आहे.

रुणाली ही सायन येथील श्री गौरीदत्त मित्तल शाळेत इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेत आहे. दरम्यान, याच शाळेतील परवेज अखत्तर, इरफान शेख व रुणाली यांनी मुंबई शहर मुली व मुलांच्या संघास जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत अनुक्रमे तिसरा व चौथा क्रमांक पटकावून दिला. याबद्दल क्रीडा शिक्षकांचे अभिनंदन करण्यात आले.