लाचखोर रेल्वे कॉन्स्टेबलला बेडय़ा

1

सामना ऑनलाइन, ठाणे

गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी आरोपीच्या मित्राकडून 15 हजारांची लाच मागणाऱया रेल्वे पोलीस कॉन्स्टेबलवर ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. गणेश वाघ (27) असे पोलीस कॉन्स्टेबलचे नाव असून आज त्याच्या घराची एसीबीने झाडाझडती घेतली असून येत्या दोन दिवसांत त्याला अटक केली जाईल, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक मदन बल्लाळ यांनी दिली.