अर्शी खानला अटक होणार?

सामना ऑनलाईन । मुंबई

सतत काही ना काही कारणांमुळे चर्चेत असलेली बिग बॉसमधील वादग्रस्त स्पर्धक अर्शी खान आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. काही आक्षेपार्ह फोटोमुळे अर्शीच्या विरोधात अटक वॉरंट निघालं असून तिला अटक होऊ शकते. जालंधर न्यायालयाने अर्शी विरोधात हे अटक वॉरंट जारी केलं आहे. काही वर्षापूर्वी अर्शीने अर्ध नग्न शरिरावर हिंदुस्थान व पाकिस्तानचे राष्ट्रध्वज काढले होते.

अर्शीच्या या प्रकारामुळे जालंधरमधल्या एका वकिलांनी तिच्या विरोधात राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याची तक्रार केली होती. या प्रकरणी मागील तीन महिन्यात तीन वेळा सुनावणी झाली मात्र १ ऑक्टोबरपासून अर्शी बीग बॉसच्या घरात आहे. त्यामुळे या सुनावण्यांसाठी अर्शी न्यायालयात उपस्थित राहू शकली नव्हती. त्यामुळे तिच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे.