लिनन; रूबाबदार आणि नाजूक

39

>> पूजा तावरे, फॅशन डिझायनर

रुबाबदार, नाजूक लिनन हे प्रत्येक मोसमात सहज चालणारं कापड आहे. उन्हाचा तडाखा शीतल करतं… थंडीतही उबदार असतं…

फॅशनबाबत म्हटलं जातं की, लेटेस्ट असे काही नसते तर जुनीच फॅशन नव्याने बाजारात येत असते. आजची तरुणाई ज्याला लेटेस्ट फॅशन म्हणून मिरवते. आज कालची ‘रफ’, ‘कूल’ आणि ‘रिंकल फ्री’ लिननसुद्धा अशीच आहे. डिझाइनर लिनन फॅब्रिकबरोबर नवीन अंदाजासह फॅशनच्या युगात पाहायला मिळते. तसेच सध्या उन्हाळय़ाच्या मौसमात लिननला पसंती दिसून येत आहे. महिलांसाठी असलेल्या लिनन शर्टस्मध्ये विविध प्रकार पाहायला मिळतात. यामध्ये कलर ब्लॉक लिनन शर्टस्, शॉर्ट स्लिव्ह लिनन शर्टस्, ऑसिमेट्रिकल लिनन शर्टस्, स्ट्राईप लिनन शर्टस्, लाँग लिनन शर्टस्, कॅज्युअल प्रिंटेड लिनन शर्टस्, प्लस साईज लिनन शर्टस्, चायनीज स्टाईल शर्टस्, रेट्रो प्रिंटिंग लिनन शर्टस् यांना पसंती मिळत आहे.

लिनन है खास
ओरिजनल लिनन वापरण्यास अतिशय सोपे असल्यामुळे यापासून तयार केलेले कपडे हे वर्षानुवर्षे नीट राहतात. तसेच हे कपडे धुतल्यानंतर एकदम नवीन आणि नॅच्युरल दिसतात. हा कपडा उत्तम आणि मजबूत फायबरपासून बनलेला असतो ज्यामुळे तुम्ही जितकं धुवाल तो तितकाच मुलायम आणि नवीन दिसतो. याशिवाय लिननचे कपडे इस्त्री केल्यानंतर तुम्हाला एक फॉर्मल लूक मिळतो. तसेच इस्त्री न करता घातल्यानंतरदेखील तुम्ही कॅज्युअल आणि केयर फ्री दिसू लागता. हे कपडे पटकन चुरगळतात व खादीपेक्षा जरा महाग असले तरी ते टिकतात जास्त. यात ब्रँडेड लिननचे कपडे बाजारात मिळतात. लिननचे कपडे अतिशय अभिरुचीपूर्ण दिसतात. लिननच्या कपड्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे शांत, सौम्य रंग आणि पोत. त्यातल्या पेस्टल शेडस् तर फारच विलोभनीय दिसतात. महिलावर्गात लिननचे शर्टस्, कुर्ते आणि लिननच्या साड्या यांची प्रचंड क्रेझ पाहायला मिळते.

सध्या लिननच्या कुर्त्यांनादेखील भलतीच मागणी दिसून येत आहे. लिननचे विविध ड्रेसेस्, ट्युनिक्स, टॉप्स, टाऊझर्स, स्कर्टस्, जंपसूट, जॅकेटस् यांचा ट्रेंड पाहायला मिळत आहे. फ्लोरल डिझाइन्सचा वाढता प्रभाव लिननवर पाहायला मिळतो. कुर्त्यांमध्ये ऍक्वा ब्ल्यू, ऑरेंज, पिस्ता, लेमन यांसारखे रंग पाहायला मिळतात.

लिनन साडी
लिनन साडी वापरणं सध्या स्टाईल स्टेटमेंट बनलं आहे. या साड्यांमध्ये ब्लॉक प्रिंटस्, जमदानी आणि बाटीक प्रकार पाहायला मिळतात. सोनम कपूर, विद्या बालन, नंदिता दास, काजोल, राणी मुखर्जी यांसारख्या अभिनेत्री लिननच्या साड्या वापरताना पाहायला मिळतात. लग्न समारंभात गडद आणि फिक्या अशा विविध रंगसंगतींमधील लिनन साड्यांची चलती वाढली आहे. काठ आणि पूर्ण जरीकाम असलेल्या अशा दोन प्रकारच्या साड्या लिननमध्ये मिळतात. जरीकाठ साडीवरील चित्रे आणि नक्षी यात विविध प्रयोग करून लिनन साडी आकर्षक दिसते. लिनन साड्यांमध्ये यलो, ऑरेंज, रेड, लाईम ग्रीन, ब्ल्यू लिननचे कापड हे फ्लॅक्स प्लांटपासून बनविले जाते. तसेच हे कापड पाणी शोषून घेत असल्यामुळे उन्हाळ्यासाठी अतिशय उपयुक्त असून यामुळे शरीर थंड राहते. लिननचे शर्टस् हे फिटिंगला लूज असल्यामुळे उन्हळ्यात याचा त्रास होत नाही.

आपली प्रतिक्रिया द्या