बल्लवाचार्य

उत्तम बल्लव. अर्थात शेफ हे एक कल्पक, चविष्ट आणि छान कार्यक्षेत्र आहे.

उत्तम स्वयंपाक करणे ही कला आहे. काही पुरुषही स्वादिष्ट, उत्कृष्ट पदार्थ बनवू शकतात. ज्यांना वेगवेगळ्या प्रकारचे चवींचे पदार्थ बनवून इतरांना खाऊ घालण्याची आवड आहे, अशी मुलं-मुली या क्षेत्रात करीयर करू शकतात.

हॉटेल इंडस्ट्रीत वाढ करण्यासाठी आज चांगल्या ‘शेफ’ची आवश्यकता असते. सध्या एखाद्या सुप्रसिद्ध उपाहारगृहातील शेफ वाहिन्यांवरील खवय्यांच्या कार्यक्रमांमध्येही दिसतात. त्यामुळे या क्षेत्रात पैसा, प्रसिद्धीही आहेच. स्वयंपाक करण्याची कला एखाद्याला आधीपासूनच असते असे नाही, तर आवड आणि पदार्थ कसे बनवायचे हे शिकण्याची तीक्र इच्छा असेल तर यामध्ये करीयर करता येऊ शकते.

संधी

  • वाढदिवस, विवाह समारंभ, धार्मिक किंवा इतर कार्यक्रमांमध्ये शेफना मागणी असते.
  • रुग्णालय, हॉटेल, रेस्टॉरंट यामध्ये शेफ म्हणून नोकरी करता येते किंवा स्वतःचे रेस्टॉरंट उघडू शकता.
  • शासनस्तरावर पर्यटनात वाढ होण्यासाठी बऱयाचशा पर्यटनस्थळावर कुकिंग स्पेशालिस्टना मागणी असते.
  • वृत्तवाहिन्यांवर खवय्यांसाठी असलेल्या विशेष कार्यक्रमात शेफची गरज असते. तिथे परीक्षक म्हणून त्यांची निवड केली जाऊ शकते.

प्रशिक्षण संस्था, महाविद्यालय

  • इन्स्टिटय़ूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, मुंबई
  • ओबेरॉय सेंटर, दिल्ली
  • इंटरनॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ वुलिनरी आर्ट, दिल्ली

पात्रता

  • शेफ होण्यासाठी कोणत्याही शाखेत पदवी प्राप्त करणे आवश्यक आहे. या क्षेत्रात प्रवेश परीक्षा आणि मुलाखतीच्या माध्यमातून प्रवेश मिळतो.
  • १२वीनंतर बीए इन हॉटेल मॅनेजमेंट, डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट, बॅचलर डिग्री इन हॉटेल मॅनेजमेंट, डिप्लोमा इन  हॉटेल ऍण्ड करीयर मॅनेजमेंट असे कोर्स करता येतात.
  • या कोर्सेसचा कालावधी ६ महिने ते ३ वर्षांचा आहे. w याव्यतिरिक्त पीजी डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट, एमएससी इन हॉटेल मॅनेजमेंट, एमएइन हॉटेल मॅनेजमेंट असे शिक्षणही घेता येते