उन्हाळ्याचे प्रॉब्लेम्स

उन्हाच्या तलखीमुळे येणाऱया घामामुळे काखेमधून दुर्गंधी येते. याकर कितीही डीओ, परफ्यूम वापरले तरी ती पुन्हा येतेच. पणकाही नैसर्गिक पद्धती वापरल्या तर ही दुर्गंधी कमी होऊ शकते.

-आंघोळ केल्यानंतर बोटांवर थोडेसे नारळाचे तेल घ्या आणि काखेवर लावा. त्वचा नारळाचे तेल शोषून घेते. दिवसातून दोन ते तीनवेळा हा प्रयोग करता येईल. मात्र, तेल लावण्यापूर्की आंघोळ करावी किंवा काखा स्वच्छ करून घ्याव्यात. नारळाचे तेल काखेत तयार होणाऱ्या जीवाणूंना नष्ट करण्याचं काम करते.

– बटाटय़ाचे काप करून काखेवर चोळावेत. काही वेळानंतर त्यावर डीओ स्प्रे करावा. दिवसातून एक किंवा दोन वेळा या प्रयोग केल्यास दुर्गंधी येणार नाही. बटाटय़ामध्ये काखेची पीएच लेव्हल नियंत्रणात ठेवण्याचे गुणधर्म आहेत.

– कापसाच्या बोळ्याने व्हिनेगर काखेत लावावे. सकाळ व संध्याकाळी हा प्रयोग केल्यास काखेतून येणारा दुर्गंध कमी होते.

– एका स्प्रे बॉटलमध्ये पाणी घ्या. त्यात लॅव्हेंडर ऑइलचे काही थेंब मिसळा. हा स्प्रे डीओप्रमाणे दररोज वापरावा. काखेवर स्प्रे केल्यानंतर घाम आला तरी त्याचा दुर्गंध येणार नाही. कारण लॅव्हेंडर ऑइलमध्ये निसर्गतःच सुंगध असून तो दुर्गंध घालवतो.

– बोटांकर कोरफडीचा थोडासा गर घेऊन काखेवर चोळावा आणि संपूर्ण रात्र तसाच ठेऊन द्यावा. कोरफडीचा गर नैसर्गिक पद्धतीनं काखेचं आरोग्य सुधारते. काखेतून येणारी दुर्गंधी कमी होते शिकाय टॅनिंगची (काळेपणा) समस्याही कमी होईल.