शिबिरांची धम्माल

<<भरत जोशी>>

(शिबीर आणि वन्य जीव अभ्यासक)

प्रदीर्घ उन्हाळय़ाची सुट्टी. साधारणत: मुलं उन्हाळी शिबिरांना जातात. कशी निवड करावी या उन्हाळी शिबिरांची

शिबिरे कशी निवडावीत

सुट्टय़ा सुरू झाल्या की जशी पावसाळय़ात सर्वत्र छत्र्या उगवू लागतात तसेच शिबिरेच शिबिरे सर्वत्र पाहायला मिळतात. दिवाळीची, नाताळची किंवा उन्हाळय़ाच्या सुट्टय़ांमध्ये अशा भरपूर शिबिरांचे पेव पाहायला मिळते.

उन्हाळ्याच्या सुट्ट्यात पालकांना येते टेंशन

उन्हाळय़ाची सुट्टी दीड ते २ महिन्यांची असून या सुट्टीत आपल्या पाल्याने काय करावे? कुठले प्रशिक्षण घ्यावे? त्यांची निवासव्यवस्था, सुरक्षा, भोजनाची व्यवस्था कशी असेल? आपल्या मुलांना काही अपघात तर होणार नाही ना? असे अनेक प्रश्न पालकांच्या मनात असतात.

मुलामुलींचा होतो कोंडमारा

शालेय तसेच महाविद्यालयीन साधारण वयोगट १० ते २५ यांना सुट्टीत काय करावे हे उमगत नाही. मग कुठे टीव्ही बघ, नवनवीन मालिका, सिनेमा, नाटक पाहण्यात, फुकटचे भटकण्यात, मित्रांबरोबर गप्पा मारण्यात अख्खी सुट्टी निघून जाते. पदरी काहीच नाही.

कलांगणतर्फेम्युझिक्रिएशन्स

हसत खेळत ६ ते १२ वयोगटातील लहान मुलांना संगीत शिकवण्यासाठी कलांगण ही संस्था ‘म्युझिक्रिएशन्स’ हे उन्हाळी शिबीर आणि छंदशाळा भरवणार आहे. २२, २३ आणि २४ एप्रिल या तीन दिवसांत मुंबईच्या शिवाजी पार्क येथील स्वा. सावरकर स्मारक भागात सायंकाळी ५ ते ७.३० या वेळेत हे शिबीर भरणार आहे. या तीन दिवसांच्या शिबिरासाठी प्रत्येक मुलामागे १७५० रुपये फी आकारली जाणार आहे. या शिबिरात संगीतावर आधारित खेळ, गायन, कथाकथन आणि हस्तकौशल्य शिकवले जाणार आहे. अधिक माहितीसाठी ९५९४९६२५८७ किंवा ८६५२२८५५४४ या दूरध्वनी क्रमांकावर विचारू शकाल.

चांगली शिबिरे कशी निवडाल?

सुट्टी पडली रे पडली की शैक्षणिक शिबिरांचा, कार्यशाळांचा, शैक्षणिक सहलींचा सुळसुळाट पाहायला मिळतो. अशावेळी विविध शिबिरांची, माहिती नीट वाचून घ्यावी.

जंगल ट्रेनिंग कॅम्प

जंगल प्रशिक्षण संस्थेतर्फे  विद्यार्थी आणि पालकांसाठी जंगल प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. २१ ते २४ एप्रिलदरम्यान भोर, पुणे येथे हे उन्हाळी शिबीर भरणार आहे. शिबिरात कमांडो ब्रिज, मंकी क्रॉस, रायफल शूटिंग, धनुर्विद्या, बोटिंग, सायकलिंग आदी प्रकार शिकवले जाणार आहेत. दुसरे शिबीर नॅशनल डिफेन्स ऍकॅडमी, खडकवासला, पुणे येथे २७ आणि २८ मे रोजी होणार आहे. शिबिरात शस्त्रास्त्र, परेड संचलन, विमानांची प्रात्यक्षिके बघायला मिळतील. तिसरे प्रशिक्षण बोरिवली येथील नॅशनल पार्कमध्ये ३ जून रोजी आहे. संपर्क ९२२१५८०८८८.

पाल्य आणि पालक यांनी नियोजन करावे

उन्हाळय़ाच्या दीड ते दोन महिन्यांच्या प्रदीर्घ सुट्टय़ा लागण्यापूर्वी पाल्य आणि पालकांनी विचारपूर्वक सुट्टय़ांचे नियोजन करावे. कुठले शिबीर चांगले आहे?  त्या शिबिरातील त्या प्रशिक्षणाचा मुला-मुलींना त्याच्ंया व्यक्तिमत्त्व विकासाच्या दृष्टीने कोणता शैक्षणिक लाभ होणार आहे. साहसी उपक्रमामुळे मुलांना त्यांच्या पुढील जीवनात कसा फायदा होईल, व्यवहारज्ञान आणि व्यवहारचातुर्य तसेच शिस्त, अनुशासनामुळे काय फायदा होईल या सर्वांचा नियोजनबद्ध आराखडा (वेळेचे नियोजन) करावे.