मुद्दा – श्रीरामांच्या सूर्य तिलकामागील विज्ञान

>> कर्नल अभय बा. पटवर्धन (निवृत्त)

अयोध्येतील राममंदिरातील प्रभू रामचंद्रांचे ललाट रामनवमीला बरोबर दुपारी बारा वाजता पाच पूर्णांक आठ सेंटिमीटर व्यासाच्या सूर्यकिरण वर्तुळाने शोभायमान झाले. या आश्चर्यजनक, अभूतपूर्व किमयेमागे भारतातील दहा शास्त्रज्ञांनी विज्ञानाचा वापर करून निर्माण केलेले एक अभियंत्र आहे. छोटे गोल आरसे आणि गोल प्रिझमच्या संमिश्रणाने (कॉम्बिनेशन) अंदाजे दोन-तीन मिनिटांसाठी किरणांना मूर्तीच्या कपाळावर आणून सूर्य तिलक लावण्यात आला.

आरसा एक परावर्तित पृष्ठभाग असून त्याचे प्रतिबिंब परावर्तन नियमानुसार निर्माण होते. प्रकाशकिरण परावर्तित पृष्ठभागावर पडल्यामुळे परावर्तित होतो. ही ऊर्जा असल्यामुळे एकतर परावर्तित होते किंवा शोषली जाते. गुळगुळीत आरसा प्रकाश ऊर्जा प्रतिबिंबित करतो. गुळगुळीत पृष्ठभागामुळे प्रकाशाची उसळी एका दिशेने होते, ज्याला स्पेक्युलर परावर्तन म्हणतात.

प्रिझम हा त्रिकोणी टोके आणि आयताकृती बाजू असलेला एक पारदर्शक, बहुभुज घन असतो, जो प्रकाशकिरणांना स्पेक्ट्रममध्ये विखुरण्यासाठी किंवा प्रकाश परावर्तित करण्यासाठी आणि विचलित करण्यासाठी वापरण्यात येतो. हे समान आकाराचे आणि समांतर टोक असलेले पॉलिहेड्रॉन असतात, ज्यांचे इतर चेहरे समांतरभुज चौकोनाच्या आकाराचे असतात. हे गोल, चौकोनी, षटकोनी आकाराचे असून त्यांचा वापर स्पेक्ट्रोस्कोप, दुर्बीण, पेरिस्कोप इत्यादींमध्ये केला जातो. पॅनडा बाल्समनी जोडलेल्या दोन पॅल्साइट प्रिझमचा एक निकोल प्रिझम बनतो. हा प्रिझम केवळ एकाच दिशेने पंपन करणाऱया लहरी प्रसारित करतो आणि अशा प्रकारे सामान्य प्रकाशापासून एक समतल, ध्रुवीकृत बीम तयार करतो. अयोध्येतील राममंदिरात याच प्रकारचे प्रिझम वापरण्यात आले आहेत.

मंदिर समितीने नियुक्त केलेल्या शास्त्रज्ञांनी टिल्ट मेकॅनिझम आणि पाइपिंग सिस्टीममध्ये चार आरसे व चारच प्रिझमचा वापर करून बनवलेले सूर्य तिलक मेपॅनिझम म्हणजे एक आरसा आणि त्यासमोर एक प्रिझम असलेल्या चार स्तरांचा एक सुंदर, वैज्ञानिक आणि तांत्रिक आविष्कार आहे. मंदिराच्या तिसऱया मजल्यावर सूर्यकिरणांना परावर्तित करून गर्भगृहात आणण्यासाठी एक छिद्र असलेले आवरण (कव्हर) लावण्यात आले आहे. शेवटचा आरसा आणि प्रिझम पूर्व दिशेला मुख असलेल्या रामलल्लाच्या ललाटाच्या मध्यभागी या सूर्यकिरणांना परावर्तित करून आणतात. टिल्ट मेपॅनिझम रामनवमीला मध्यान्हीवेळी माथ्यावर आलेल्या सूर्याच्या किरणांना पहिल्या आरशाच्या माध्यमातून उत्तरेकडील दुसऱया आरशाकडे परावर्तित करते. त्यानंतर पहिला व दुसरा प्रिझम, तिसरा आरसा व चौथा आरसा तसेच तिसऱया व चौथ्या प्रिझमद्वारे किरणांचा गोलक भगवान राममूर्तीच्या कपाळावर येतो. ही प्रक्रिया आता प्रत्येक रामनवमीला होईल. टिल्ट मेपॅनिझमचे पाइप व इतर सर्व भाग उच्च प्रतीच्या पितळय़ाच्या धातूने बनले असून प्रिझमदेखील अत्युच्च दर्जाचे आहेत. अनेक वर्षे टिकण्यासाठी बनलेल्या या अभियंत्राच्या आतील बाजूस काळ्या पावडरचा थर (ब्लॅक पावडर कोटिंग) दिलेला असल्यामुळे आत आलेली सूर्यकिरणे विखुरली जात (स्पॅटरिंग ऑफ सन रेज) नाहीत. सगळ्यात वरच्या छिद्रामध्ये बसवलेल्या इन्फ्रारेड फिल्टर ग्लासमुळे सूर्यकिरणांतील हीट वेव्हज् ब्लॉक होऊन मूर्तीवर पडत नाहीत.

सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिटय़ूट, रुरकी आणि इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ अॅस्ट्रोफिजिक्स, बंगळुरू येथील शास्त्रज्ञांच्या समन्वयाने हे सूर्य तिलक मेपॅनिझम बनवण्यात आले आहे. एक स्पेशल गिअर बॉक्स, परावर्तित आरसे आणि लेन्सेसच्या सहाय्याने तिसऱया मजल्यावर येणाऱया सूर्यकिरणांना गर्भगृहात आणण्यासाठी सीबीआरआयच्या शास्त्रज्ञांनी सोलर ट्रकिंग प्रणालीचा अवलंब केला. अचूक निदान आखणी (प्रिसाईझ अलाईनमेन्ट) केली. यात त्यांना आयआयएचचे शास्त्रज्ञ व बंगळुरूच्या ऑप्टिका मॅन्युफॅक्चरिंग पंपनीची मदत झाली. चांद्रीय दिनदर्शिकेनुसार (ल्युनार पॅलेंडर) रामनवमी एका विशिष्ट दिवशीच येत असल्यामुळे प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीला दरवर्षी अचूकपणे सूर्य तिलक लागेलच असा विश्वास सीबीआरआयच्या शास्त्रज्ञांना वाटतो आहे.

सूर्य तिलक प्रकल्पातील शास्त्रज्ञांच्या या टीममध्ये सीएसआयआर/सीबीआरआय डायरेक्टर, डॉक्टर आर. प्रदीप कुमारांच्या नेतृत्वात डॉ. एस. के. पाणिग्रही, आर. एस. बिष्ट, कांती सोलंकी, व्ही. चक्रधर तथा दिनेश आणि समीर कार्यरत होते. आयआयएचे डायरेक्टर डॉ. एस. अन्नपूरनीच्या नेतृत्वाखाली डॉ. एस. श्रीराम व तुषार प्रभू आणि ऑप्टिका पंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर रजिंदर कटारिया, नागराज, विवेक व थवकुमार यांचाही सक्रिय सहभाग या प्रकल्पात होता.

[email protected].