आनंदी वृत्तीचा शास्त्रज्ञ

147

>> शैलेश माळोदे

वैज्ञानिक फक्त विज्ञानातच रमतात हे विधान आरजी. अर्थात प्रा. राघवेद्र गदगकर यांनी आपल्या हिंदी साहित्याच्या आवडीतून खोटे ठरविले आहे.

इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्समध्ये येण्याचं दिलेलं आमंत्रण एखाद्या विज्ञान पत्रकाराच्या दृष्टीने अगदी ‘सुवर्णसंधीच’. आणि मी या संस्थेच्या सेंटर फॉर कॉन्टेम्पररी स्टडीजमध्ये व्हिजिटिंग सायंटिस्ट म्हणून दोन महिन्यांकरिता दाखल झालो. या केंद्राचे अध्यक्षपद भूषवणारे वैज्ञानिक आणि माझे यजमान होते उक्रांती आणि प्राणी व्यवहार याविषयी जगात अत्यंत ख्यातनाम असलेले प्रा. डॉ राघवेंद्र गदगकर. यांच्याशी या निमित्ताने खूप वेळा भेट आणि चर्चा झाल्या. त्यामधून उलगडत गेलं ते एका प्रसन्न व्यक्तिमत्त्वाच्या शास्त्र्ाज्ञाचे संशोधनकार्य आणि समजलं की किती महत्त्वाचं आहे उक्रांतीचे क्षेत्र आणि त्यांचं सामाजिक जीवनातलं स्थान.

गप्पा मारताना प्रा. राघवेंद्र गदगकर यांनी दिलखुलासपणे आपल्या बालपणाच्या ‘रम्य’ आठवणी शेअर केल्या. ते म्हणाले, ‘माझे वडील हिंदुस्थानी वायुदलात पायलट होते आणि त्यांच्या वारंवार बदल्या होत आणि मग आम्ही सर्व कुटुंबकबिला त्या ठिकाणी मुक्कामाला पोहोचत असे, पण तो मुक्कामाचा काळ अनिश्चित असे. पण तो अत्यंत आनंदाचा काळ होता. माझं औपचारिक शालेय शिक्षण तसं बऱयाच उशिरा सुरू झालं. बऱयाचदा ते अनौपचारिक होतं. सर्वसामान्यपणे एखाद्याला जे ‘फॉर्मल स्कूलिंग’ लाभतं त्यापेक्षा ते कमी काळ असल्यामुळे मला स्वप्न पाहायला, निसर्गात फिरायला आणि माझे-माझे विचार करायला संधी लाभली. मात्र मला औपचारिक शिक्षणातदेखील आनंद वाटत होता. मला आतादेखील खूप काम करायला आवडतं. कामाबरोबर स्वप्नही पाहिली पाहिजेत. परिश्रम आणि स्वप्न दोन्ही गोष्टी वेगळय़ा नाहीत. स्वप्न पाहिली पाहिजेत मग ती पूर्ण करण्यासाठी परिश्रम केले पाहिजेत. नेमकं हेच मी केलं.

कानपूर येथे जन्मलेल्या प्रा. राघवेंद्र गदगकर यांना जवळचे लोक ‘आरजी’ या संक्षिप्त नावाने ओळखतात. बेंगळुरू येथे ते स्थायिक असले तरी जर्मनीत ते बराच काळ वास्तव्यास असतात. प्राणी व्यवहार या विषयात त्यांना गोडी होती. त्यांनी प्रा. गाडगीळांबरोबर सेंटर ऑफ इकॉलॉजिकल स्टडीजमध्ये कार्य केललं असून त्या केंद्राचं अध्यक्षपददेखील भूषविलं आहे.

प्रा. राघवेंद्र गदगकर मॉलिक्युलर बायॉलॉजी विषयाकडे ते जवळपास ढकलले गेले होते. त्याविषयी खुलासा करताना ते म्हणाले, ‘मी जेव्हा बी.एस्सी. (ऑनर्स) आणि एम.एस्सी. करीत होतो तेव्हा मला दोन विषयांकडे ओढा वाटत होता. ते विषय म्हणजे रेजवीय जीवशास्त्र्ा आणि प्राणी व्यवहार. परंतु मला साहित्यामध्ये देखील प्रचंड रुची होती. हिंदी साहित्यातदेखील. मला सीमारेषा मान्य नाहीत. असे कप्पे नसतात. जीवशास्त्र्ा आणि साहित्यामध्ये एकाच वेळी रूची असू शकतेच. असे कप्पे अर्थशून्य आहेत. त्याबाबत हे दोन्ही विषय एकत्र करणे अगदी ‘अनथिंकेबल होते’. इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स बेंगळूरू ही संशोधनकार्यासाठी हिंदुस्थानातील सर्वोत्तम संस्था आहे यात वादच नाही. ती पूर्वी ही होती आणि आतादेखील आहे. त्यावेळी रेजवीय जीवशास्त्र्ााचा कार्यक्रम त्यांनी नुकताच सुरू केला होता आणि तिथे एकच जागा होती. माझी निवड झाली. त्यावेळी संस्थेकडे प्राणी व्यवहारविषयक कोणताही कार्यक्रम नव्हता. मी दोन्ही विषयांपैकी एक विषय औपचारिकपणे स्वीकारला असता आणि दुसरा छंद म्हणून. हेच उलटही झालं असतं.

युसोशॅलिटीविषयी त्यांनी ‘ऍश्युअर्ड फिटनेस रिटर्नस्’ विषयक मांडलेला सिद्धांत आकडेवारीतून सिद्ध झालेला असून 1964 साली डब्ल्यू डी. टॅमिल्टन यांनी केलेल्या प्रचंड कार्यानंतर या क्षेत्रातले लक्षणीय योगदान म्हणून ओळखला जातो. गेल्या तीन दशकांपासून त्यांनी याबाबत संशोधन करणारा एक प्रभावी गट तयार केलाय. विज्ञान विषय धोरणांबाबतची त्यांची काही मतं वादग्रस्त ठरली असली तरी त्यांनी कायम खुल्या वैज्ञानिक शोधनिबंधाची कास धरलेली आहे. 1993 साली भटनागर पारितोषिक प्राप्त झालेले प्रा. गदगकर अमेरिकेच्या नॅशनल ऍकॅडमी ऑफ सायन्सेसचे अगदी मोजक्या हिंदुस्थानींपैकी एक फॉरेन असोसिएट असून त्यांना 95 साली जर्मन सरकारने ‘क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मेरिटनं’ सन्मानित केलंय.

सी. पी. स्नो या शास्त्र्ाज्ञाने विज्ञान आणि कला क्षेत्र या दोन संस्कृती असून त्या एक होऊन ‘थर्ड कल्चर’ म्हणून नवी संस्कृती आकारास येईल असं म्हटलं होतं. त्याचे पाईक प्रा. राघवेंद्र गदगकर 2004 साली स्थापन झालेल्या सेंटर फॉर कॉन्टेम्पररी स्टडीजचे संस्थापक होते. ‘वैज्ञानिकांनी मजा म्हणून आजूबाजूच्या गोष्टींकडे डोळे उघडे ठेवून बघितलं पाहिजे आणि उर्वरित सगळं नशिबावर सोडलं पाहिजे. आधीच मी अमूक तमूक करणार आहे असं ठरवून मजा येत नाही. वैज्ञानिकांनीच नव्हे तर सर्वांनी आपापल्या कामात आनंद घ्यायला हवा. त्यामधूनच अधिक चांगलं काम घडतं. महाविद्यालयीन शिक्षण घेताना हेच माझं करीयर ठरेल हे मात्र ठाऊक नव्हतं. ते मात्र आता बनलंय. यात खूप आनंद आहे’ असं सांगून प्रा. राघवेंद्र गदगकर म्हणाले की, ‘हिंदुस्थानने परदेशातील फॅड्स विषय, याबाबत आपली ऊर्जा खर्च न करता स्वतःच्या देशासाठी उपयुक्त विषयांमध्ये कमी साधनांत कसं संशोधन होईल याकडे लक्ष पुरवलं पाहिजे. ते शक्य आहे, फक्त करायला हवं.’

असे प्राध्यापक राघवेंद्र गदगकर एक आनंदी, मनस्वी, यशस्वी व्यक्तिमत्त्वाचे वैज्ञानिक, साहित्य आणि संपूर्ण जीवनात रुची असलेले एक मॉडेल आयकॉन.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या