डहाणूचा थरथराट…

110

>> वैदेही वाढाण

डहाणू तालुक्यात होणारे भूकंप हे अगदी तलासरी तसेच गुजरातच्या हद्दीत जाऊन पोहोचले आहेत, ही अतिशय धोक्याची घंटा आहे. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून डहाणूकर भीतीच्या सावटाखाली आहेत. भूकंपामुळे मुले शाळेत जायलादेखील घाबरत आहेत. सुरुवातीला या भूकंपाकडे सरकारी अधिकाऱयांनी दुर्लक्ष केले. मात्र बोंबाबोंब झाल्यानंतर भूगर्भ शास्त्र्ाज्ञांनी धाव घेऊन अभ्यास सुरू केला. तीन ठिकाणी भूकंपमापन यंत्रे बसवली. मात्र त्यापलीकडे काहीच झाले नाही. शाळेतील मुलांना, गावकऱयांना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत भूकंपापासून बचाव कसा करायचा याचे फक्त ट्रेनिंग दिले. मात्र त्यांच्या भवितव्याचा विचार कुणीच केला नाही.

डहाणू म्हटले की आपल्यासमोर उभा राहतो तो निळाशार समुद्र.. हवाहवासा वाटणारा निसर्ग आणि आल्हाददायक वातावरण. येथील समुद्रकिनाऱयावर अनेक जण पर्यटनासाठीदेखील येतात. निसर्गाशी एकरूप झालेला डहाणू तालुका सध्या भूकंपाशी झगडतोय. येथील रहिवाशी रोज थरथराट अनुभवत असून एकामागोमाग एक भूकंपाचे धक्के बसत असल्याने त्यांची झोप उडाली आहे. पालघर जिह्याला भूकंप तसा नवा नाही. 2013 व 2017 मध्ये जव्हारवासीयांनी भूकंप अनुभवला होता. येथील भूगर्भामध्ये गेल्या काही वर्षांपासून प्रचंड उलथापालथ होत असून त्याचाच परिणाम म्हणजे वारंवार होत असलेले भूकंप. 2013 साली जव्हार शहरासह 15 किलोमीटर अंतरावरील वाळवंडा, खडकपाडा आणि पाथर्डी हा परिसर भूकंपाने हादरला होता. गेल्या तीन महिन्यांपासून डहाणू तालुक्यातील 17 ग्रामपंचायतींच्या हद्दीत लहानमोठे 29 भूकंपाचे धक्के बसले.

गेल्या वर्षी 11 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 3.2 रिश्टर स्केलचा भूकंप झाला आणि आदिवासींच्या दुर्दैवाचे फेरे सुरू झाले. येथील वाडय़ा, पाडे, छोटी गावे येथे भूकंप होत असल्याने घरात राहणे मुश्कील झाले आहे. अगदी अलीकडे 1 फेब्रुवारी रोजी एकाच दिवशी भूकंपाचे पाच धक्के बसले. 4.1 रिश्टर स्केलचा सर्वात मोठा धक्का होता. संध्याकाळच्या सुमारास भूकंप झाला तेव्हा नेहमीप्रमाणे पळापळ सुरू झाली. अनेक जण जिवाच्या आकांताने घराबाहेर पडले. हळदपाडा येथील घरात राहणारे रमेश भुयाळदेखील आपल्या मुलाबाळांसह कसेबसे बाहेर पडू शकले. मात्र यावेळी त्यांची दोन वर्षांची चिमुकली जिवाच्या आकांताने बाहेर पडली खरी, पण समोरच्याच भल्यामोठय़ा दगडावर आपटली आणि जागीच तिचा मृत्यू झाला.

डहाणू तालुक्यात होणारे भूकंप हे अगदी तलासरी तसेच गुजरातच्या हद्दीत जाऊन पोहोचले आहेत, ही अतिशय धोक्याची घंटा आहे. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून डहाणूकर भीतीच्या सावटाखाली आहेत. भूकंपामुळे मुले शाळेत जायलादेखील घाबरत आहेत. सुरुवातीला या भूकंपाकडे सरकारी अधिकाऱयांनी दुर्लक्ष केले. मात्र बोंबाबोंब झाल्यानंतर भूगर्भ शास्त्र्ाज्ञांनी धाव घेऊन अभ्यास सुरू केला. तीन ठिकाणी भूकंपमापन यंत्रे बसवली. मात्र त्यापलीकडे काहीच झाले नाही. शाळेतील मुलांना, गावकऱयांना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत भूकंपापासून बचाव कसा करायचा याचे फक्त ट्रेनिंग दिले. मात्र त्यांच्या भवितव्याचा विचार कुणीच केला नाही.

…आणि एनडीआरएफची टीम धावली
घराला पडलेल्या भेगा.. कोसळलेले ढिगारे आणि कोणत्याही क्षणी जिवाचा थरकाप होणारा आवाज यामुळे डहाणूचे वातावरणच बदलून गेले आहे. सतत होणाऱया भूकंपामुळे जपानसारखी परिस्थिती निर्माण होते की काय अशी भीती निर्माण झाली आहे.

1 फेब्रुवारी रोजी झालेल्या भूकंपाच्या मालिकेनंतर सरकारला जाग आली आणि एनडीआरएफची टीम पाठवली. या टीमने काही ठिकाणी तंबू ठोकले. रहिवाशांना जबरदस्तीने घराबाहेर काढून त्यांना तंबूत राहायला सांगितले. ही फरपट किती दिवस चालणार? हे भूकंप नेमके होतात तरी का? भूकंपाच्या फेऱयातून सुटका होणार तरी कधी? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने विचारले जात आहेत. डहाणूतील लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला यांच्या चेहऱयावर सतत भीती. पोटापाण्यासाठी मोलमजुरी करत फिरायचे, पाण्यासाठी वणवण करायची की भूकंप येतो म्हणून या भागातून त्या भागात जायचे हेच कळत नाही.

भय इथले संपत नाही

डहाणू, तलासरीत होत असलेल्या भूकंपाकडे केवळ स्थानिक समस्या समजून दुर्लक्ष करणे योग्य होणार नाही. धुंदलवाडी, बहरे, वांकस, पळसपाडा, सासवद, चिंचले, विकासवाडी ही नावे यानिमित्ताने चर्चेत आली आहेत. भूकंपग्रस्त भागापासून 18 किलोमीटर अंतरावर कुर्जे धरण, सूर्या प्रकल्पातील कवडसा, धामणी ही धरणे असून त्याशिवाय जव्हारमध्ये दमणगंगा व वैतरणा ही खोरेदेखील आहेत. पालघर जिह्यात 77 प्रकल्पांची कामे सुरू असून आणखी तेवढेच प्रकल्प प्रस्तावित आहेत. गौण खनिजासाठी वारंवार सुरूंग लावून स्फोट घडवले जातात. रिलायन्स औष्णिक विद्युत केंद्र, तारापूर अणुशक्ती ऊर्जा केंद्र, एमआयडीसी असे महत्त्वाचे प्रकल्प आहेत. भूकंपाची तीक्रता वाढली तर देशाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या प्रकल्पांना मोठा धोका निर्माण होऊ शकतो. हैदराबाद येथील नॅशनल जिओफिजिकल रिसर्च इन्स्टिटय़ूट व दिल्लीच्या भूगर्भ शास्त्र्ाज्ञांच्या पथकाने डहाणूत येऊन परिसराची पाहणी करून स्थानिकांशी चर्चाही केली. या पथकाने अभ्यासाअंती भविष्यात डहाणूला कोणताही मोठा धोका नसल्याची ग्वाही दिली आहे. मात्र असे असले तरी येथील लोकांची अवस्था ‘भय इथले संपत नाही’ अशी झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या