मुद्दा : मोदी विरुद्ध मोदि

706

> व्यंकटेश बोर्गीकर

मोदी म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ‘मोदी’ म्हणजे मोठे दिग्गज. यात सोनिया गांधी, शरद पवार, मनमोहन सिंग, राहुल गांधी, मुलायमसिंग यादव, सीताराम येचुरी आदी सगळे आहेत. परंतु हे सगळे दिग्गज स्वतःचा अहंपणा व प्रादेशिकता राखून गटागटाचे समूह करून एकत्र आले आहेत.

यांचा एकमेव कार्यक्रम म्हणजे ‘मोदी हटाव, देश बचाव’. ते यासाठी की, मोदींनी 2014 साली दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत, देशात असहिष्णुता वाढीस लागली, नोटाबंदीच्या चुकीच्या निर्णयामुळे सामान्यजनांचे अतोनात हाल झाले इत्यादी इत्यादी. त्यातल्या देशात असहिष्णुता वाढली याचे समर्थन करण्यासाठी बॉलीवूडच्या दिग्गज कलाकारांनी आपल्या आवाजाच्या टिपेचा व प्रसारमाध्यमांचा भरपूर वापर केला. इतकेच नाही तर काही काही मराठी लेखक मंडळींचा ‘कंपूही’ यात सामील झाला होता.

‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, राजकारणातली घराणेशाही मोडीत काढा, तर येथे घराणेशाही मजबूत करण्याचं काम चाललंय.
कालाय तस्मै नमः!

आता ‘मोदीं’बद्दल दोन शब्द.

एका अमेरिकन माणसानं मोदींबद्दल म्हटलं होतं…

‘Modi is not only a surname but it is a qualification.’

M – master, O – of, D – Developing, I – India (Master of devoloping India) (Modi)

अशा मोदींना त्यांच्या एकूण सर्वंकष कर्तृत्वामुळे बाहेरील राष्ट्रांनी गौरविले आहे, त्यात सौदी अरेबियाचाही समावेश आहे. असे असतानाही आपल्याकडे हे प्रथमच घडत आहे की, ‘मोदी’ या एका व्यक्तीविरुद्ध इतक्या पराकोटीच्या विरुद्ध मतांची, विचारांची असंख्य लोकनेते एकवटले आहेत. मतदान तर संपले आहे. आता 23 मे 2019 रोजी खरे चित्र बाहेर येईल. ‘दूध का दूध और पानी का पानी’ होईल. तोपर्यंत वाट पाहूया.

आपली प्रतिक्रिया द्या