वेब न्युज : स्वयंचलित वाहनांमध्ये जीपीएस स्पूफिंग शोधण्यासाठी कायदेशीर यंत्रणा

84

जीपीएस प्रणाली ही आता आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक बनत चालली आहे. एखादा पत्ता शोधण्यापासून, ते एखाद्या जीपीएस एंबेड असलेल्या यंत्राची भौगोलिक स्थिती शोधणे, वाहतूक व्यवस्थापन, वाहनांचे लाइव्ह लोकेशन, विमान वाहतूक अशा कितीतरी कार्यात आज जगभर जीपीएसची महत्त्वाची मदत मिळते आहे. याच गोष्टीचा फायदा घेऊन अनेकदा स्वयंचलित वाहनातील जीपीएस सिस्टिमला हॅक करण्याचा अथवा, तिच्यात फेरबदल करून चुकीचे संदेश पोचवण्याचा प्रयत्न विघातक व्यक्तींद्वारा केला जातो.

जीपीएस स्पूफिंग या प्रकारात वाहनातील जीपीएस रिसिव्हिंग प्रणालीला चुकीचे सिग्नल प्रसारित केले केले जातात, तर जीपीएसवरती थेट हल्ला करून मूळ सिग्नलमध्येदेखील बदल करण्याचा प्रयत्न केला जातो. ‘Southwest Research Institute’ने आता या हल्ल्यांपासून कायदेशीर बचावासाठी तसेच संरक्षणासाठी एक सायबर सुरक्षा प्रणाली तयार करण्यात यश मिळवले आहे. याआधी हल्ला केला गेलेल्या आणि स्पूफ करण्यात आलेल्या जीपीएस सिस्टिम्सचे प्रदर्शन करणे, त्यांची माहिती इतरांना करून देणे आणि त्यांच्या विश्लेषणाद्वारे अधिक ताकदवान अशी जीपीएस सुरक्षा प्रणाली बनवणे हे यामागचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या प्रणालीमध्ये तंत्रज्ञ गाडीच्या प्रत्यक्षातल्या जीपीएस एंटेना आणी या जीपीएस सिग्नल्सना रिमोटली कंट्रोल करणारे ग्राऊंड स्टेशन यांना समांतर असे एक फिजिकल कंपोनंट एंटेनावर किंवा तिला समांतर स्थापीत करतात. हे फिजिकल कंपोनंट ऑन व्हेइकल अँटेनाच्या द्वारे प्रत्यक्षातले जीपीएस सिग्नल प्राप्त करतात, त्यावरती प्रक्रिया करतात आणि त्यानंतर या योग्य सिग्नल्सच्या जागी स्पूफ अर्थात चुकीचे सिग्नल्स गाडीच्या जीपीएस रिसीव्हरला प्रसारित करतात. यामुळे या यंत्रणेला गाडीच्या पूर्ण जीपीएस प्रणालीवरती कंट्रोल प्राप्त होतो. अशा प्रकारे तंत्रज्ञांना गाडीच्या जीपीएस रिसिव्हर्सची क्षमता आणि संरक्षण याचा पूर्ण अभ्यास करणे शक्य होते. जीपीएस प्रणाली ही आता वाहतूक आणि वाहन दोन्हींसाठी अत्यावश्यक अशी प्रणाली बनलेली असल्याने तिच्या सुरक्षेची काळजी घेणे हे अत्यंत आवश्यक बनले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या