गरोदरपणात मनाचे आरोग्य जपा

आज जागतिक मानसिक आरोग्य दिन, आई होण्याच्या आनंदाबरोबरच अनेकदा नैराश्य आणि असुरक्षिततेच्या भावनांना सामोरे जावे लागते. गरोदरपणात मानसिक आरोग्याची काळजी घेणे हे आई आणि बाळ असे दोघांसाठी आवश्यक आहे. यासंदर्भात डॉ. मधुलिका सिंग, (प्रसुती आणि स्त्रीरोग तज्ञ, अंकुरा हॉस्पिटल्स, पुणे) यांनी केलेले मार्गदर्शन...

जीवनातील या महत्त्वपूर्ण टप्प्यात एखाद्या स्त्राrला अनेक प्रकारच्या भावनांचा सामना करावा लागू शकतो आणि त्यामुळे गर्भधारणा अनेकदा आव्हानात्मक ठरू शकते. बाळाचे संगोपन, योग्य पोषण, आहार, बाळाचा शारीरिक विकास याबाबत गर्भवती महिलांना काळजी वाटते. संपूर्ण गर्भधारणेदरम्यान शरीरात अनेक शारीरिक, मानसिक आणि भावनिक बदल होतात. शरीरातील हार्मोनल असंतुलनामुळे मूड स्विंग्ज होऊ शकतात. नकारात्मक विचार आणि नैराश्य येणे, विशिष्ट भावना यादरम्यान दिसून येतात.

अशा अनेक स्त्रिया आहेत ज्यांना गर्भधारणेपासून ते प्रसुतीपर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेची भीती वाटते. जर जास्त तणावाखाली वावरलात तर गर्भधारणेच्या सर्वच टप्प्यांमध्ये नैराश्याचा सामना करावा लागतो. काही गरोदर स्त्रिया त्यांच्या आई होण्याच्या क्षमतेबद्दल किंवा मूल वाढवण्याच्या त्यांच्या आर्थिक क्षमतेबद्दल घाबरतात. इतकेच नाही तर काहींना बायपोलर डिसऑर्डर, पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर, पॅनिक डिसऑर्डर, ऑब्सेसिव्ह-पंपल्सिव डिसऑर्डर इत्यादींचा सामना करावा लागू शकतो.

गरोदरपणात अतिश्रम टाळा आणि घ्या पुरेशी विश्रांती
तुम्हाला आनंद देणाऱया गोष्टींचा दैनंदिन जीवनात समावेश करा. चालणे, ध्यान किंवा योग करा तसेच चित्रकला किंवा विणकामाचा आनंद घ्या, तणावापासून दूर रहा.

काही सूचना
 शारीरिक हालचाली सुरू ठेवा. सक्रिय राहण्याचा प्रयत्न करा. फिटनेस ट्रेनरच्या मार्गदर्शनाखाली व्यायाम करा. पौष्टिक आणि संतुलित आहाराचे सेवन करा.
 मानसिक आधारासाठी इतर गर्भवती महिलांशी संपका&त राहण्याचा प्रयत्न करा.
 अल्कोहोल किंवा ड्रग्जचे सेवन टाळा. धूम्रपान सोडा.
 भावनिक आधार देणाऱया प्रियजनांशी संपर्कात रहा. त्यांच्याशी बोला.
काय केले पाहिजे?
नैराश्याचा सामना करणाऱया गरोदर महिलांनी थेरपीच्या माध्यमातून वेळीच त्यावर मात करणे ही काळाची गरज आहे. समुपदेशनामुळे या महिलांना तज्ञांच्या मदतीने विविध मानसिक आरोग्य विविध स्थितींवर मात करता येते.