भाजपचा ‘शो’ फुकटच जाणार!

>> मधुकर मुळूक

महाराष्ट्र राज्यातील भारतीय जनता पक्ष एखाद्या सर्कशीसारखा वाटू लागला आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा ‘हंटर’ घेऊन कधी अवतरतील याचा नेम नाही. त्यामुळे खोट्य़ा कसरती करणे हे भाजपवाल्यांचे नित्याचे काम झाले आहे. मुख्यमंत्री फडणवीस पालघरमध्ये म्हणाले की, ‘वनगांना आम्ही केवळ खासदार समजत नव्हतो तर ते आमच्या कुटुंबाचे सदस्य समजतो. त्यांच्या मुलासाठीच नव्हे, संपूर्ण परिवारासाठी भाजपची दारे कायम उघडी असतील.’ निवडणूक आहे म्हणून मुख्यमंत्री असे बोलत आहेत. यापूर्वी त्यांना वनगा कुटुंबीयांची आठवण का आली नाही? अशाच डरकाळय़ा त्यांनी कल्याणातदेखील फोडण्याचा केविलवाणा प्रयत्न केला होता. काय झाले? शिवसेना कल्याण-डोंबिवली महापालिकेत सत्तेत आली. काल-परवा ‘आम्हीच कल्याण-डोंबिवलीचे महापौरपद पटकावणार म्हणत भाजपने बाह्या सावरल्या, पण शिवसेनेचाच महापौर झाला. तोही बिनविरोध. हे सर्कशीतले प्राणी तंबूत परतले. मुद्दा चिंतामण वनगा किंवा त्यांचा मुलगा श्रीनिवास वनगांचा होता. वडिलांचे निधन झाल्यानंतरही हे तथाकथित ‘परिवार सदस्य’ त्यांची साधी चौकशी करू शकले नाही. सत्तेत एवढे मग्न आहेत की कोण हे चिंतामण वनगा? कोण प्रमोद महाजन? कोण प्रा. राम कापसे? याचा मुख्यमंत्र्यांसह सर्वच भाजपच्या बोलघेवडय़ा नेत्यांना विसर पडला. श्रीनिवास वनगा यांना शिवसेनेने ‘मायेची ऊब’ दिली. सध्या भाजपचा देशभर पराभव होतोय. पालघर-भंडाऱ्यातही तसेच होणार म्हटल्यावर मुख्यमंत्र्यांनी पुन्हा सर्कस ‘हाऊसफुल्ल’ करण्याचा प्रयत्न केला, पण तो ‘शो’ फुकटच जाणार आहे. भाजपवाल्यांना मी आणखी काही सांगू इच्छितो. मराठवाडा-विदर्भातले शेतकरी आत्महत्या करत होते, तेव्हा त्या शेतकऱ्यांच्या अनाथ मुलांना मुंबई-ठाण्यात आणून आधार दिला तो शिवसेनेनेच. काही अडलं-बिडलं तर शिवसेना ठाणे विभागाचा संपर्क नंबर आहे असेही त्यांना सांगितले. अहो, अनाथ, अनोळखी मुलांना शिवसेना वाऱ्यावर सोडत नाही. श्रीनिवास वनगा हे तर ‘खासदार पुत्र’ आहेत. तेच पुन्हा पालघरमधून निवडून येईल या भीतीने मुख्यमंत्री हतबल झालेले दिसतात. पालघरची जागा शिवसेनाच जिंकणार.

भाजपने वाऱ्यावर सोडलेले प्रश्न
– मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण नाही.
– भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक कागदावरच.
– शेतमालाला हमीभाव नाही.
– शेतकऱयांचा सातबारा आजही कोरा नाही.
– विक्रमी तूरडाळ-साखर पिकली. ती वाऱयावर आणि पाकिस्तानकडून मात्र साखर आयात केली जाते.
– कल्याण-डोंबिवलीच्या २७ गावांना ६ हजार कोटी देणार होते. सर्वांनाच वाऱयावर सोडलं.
– दूध फुकट विकावं नव्हे वाटावं लागतं.
– अंगणवाडी सेविकांना वेतनवाढ नाही. डॉक्टर संपावर, गिरणी कामगारांना वाऱयावर…
– जनतेच्या बँक खात्यात १५ लाख जमा नाही. मोदी-मल्ल्या देशाबाहेर, दाऊदचा पत्ता नाही.
– शेतकरी, शेतमजूर वाऱ्यावर.

  • vasant

    who is going to vanish from Maharashtra think twice , bhajapa is many time strong than you or your party . what you need is control on your statements and behavior. Any way every one learn lessons from their own exeperience only