तांदुळजाचे सरदार बावणे घराणे

  • सतीश कदम

त्रपती शाहू महाराजांच्या कारकीर्दीत महाराष्ट्रात अनेक नामांकित घराण्यांनी आपली तलकार गाजवत स्वराज्याची सेवा बजावली. स्वातंत्र्यानंतरचा इतिहास लिहीत असताना तो छत्रपती आणि पेशवे यांच्याभोवती केंद्रित झाल्याने अनेकविध सरदारांच्या पराक्रमाची गाथा समोर न आल्याने अनेक ऐतिहासिक घटना उपेक्षितच राहिल्या. असेच मराठ्यांचे नामांकित सरदार नाईक बावणे घराणे इतिहासकारांच्या लेखणीतून सुटले. मध्ययुगीन कालखंडात हिंदुस्थानातील एक लढवय्ये घराणे म्हणून या घराण्याची ख्याती असून अगदी जयपूरचा राजा मिर्झा राजे जयसिंगामार्फत हरिद्वारचे रागरवंशीय घराणे मोगल बादशहा जहांगीरच्या चाकरीत गेले. आपल्या पराक्रमाच्या जोरावकर त्यांनी अगदी थोड्याच कालावधीत नाम कमाववले. त्यामुळे जहांगीरने त्यांना राव हा किताब दिला. पुढे दिवसेंदिवस या घराण्याच्या पराक्रमाची चढती कमान होती. एकदा शहाजहानच्या काळात सगर अर्थात सूर्यवंशीय पुरुषाने ५२ दिवसांत ५२ किल्ले जिंकून आपला पराक्रम दाखविला तेव्हा शहाजहान बादशहा या घराण्यातील पराक्रमी सरदारावर खूश होऊन त्यांना नाव दिले ‘बावणे.’ या विषयीचा उल्लेख एका कवितेत पुढीलप्रमाणे आलेला आहे-

‘बावन किल्ले बावनी दिनी साहेजहान।
तब ते नाम प्रसिद्धी मे आयो सिंध सुजान।।’

साहजिकच पुढे त्यांना बावणे या नावाने ओळखले जाऊ लागले. शहाजहानने सुजानराव, औरंगजेबाने नाईकराव तर बहादूरशहाने बावणे सरदारांना निशानजेब किताब देऊन सन्मानित केले आहे. अशा रीतीने १६ व्या शतकापासून हे घराणे मिर्झाराजे जयसिंहाच्या सोबत महाराष्ट्रात आले. पुढे औरंगजेबाने बावणे सरदाराला धारूर सरकारमधील पांगरी, पिरपिंपळगाव, मांग देऊळगाव, देवडी देऊळगाव, भाईखेड ही पाच गावे जहांगिरीत दिली होती. पैकी आज जालना जिल्ह्यात असणाऱ्या या पांगरीला बावणे पांगरी म्हटले जाते. मालोजी बावणे हे प्रथम या परिसरात स्थिरावले. नागरकोट (जि. कांगरा) हिमाचल प्रदेश येथील काडेश्वरीदेवी ही बावणेंची मूळ कुलदेवता. बावणे घराण्याचा इतिहास तसा जानोजीराव बावणे यांच्यापासून सुरू होतो. औरंगजेबाच्या निधनानंतर मालोजीचे पुत्र जानोजीराव हे सातारचे छत्रपती शाहू यांच्याकडे चाकरीस गेल्यानंतर छत्रपतींनी त्यांना उस्मानाबाद जिल्ह्यातील गिरवली आणि तांदुळजा (सध्या लातूर जिल्हा) ही दोन जहागिरीत दिल्याने बावणे घराण्यांनी या दोन्ही ठिकाणी मोठ्या, विस्तीर्ण गढ्या बांधल्या.

jagar-itihasacha-1

आज दोन-चार ठिकाणी बावण्यांच्या गढ्या असल्या तरी तांदुळज्याची गढी ही फारच प्रशस्त आणि संरक्षणाच्या दृष्टीने महत्वाची असून गढीची तटभिंत एवढी मोठी आहे की त्या भिंतीकरून एक बैलगाडी सहज जाऊ शकेल. चार बुरुजांनी सज्ज असणाऱ्या गढीत दिवाणखान्यापासून घोड्याच्या पागा आणि हत्तीशाळा असल्याने बावणेंच्या वैभवाची साक्ष पटते. खरं तर बावणे सरदार पुढे मराठेशाहीचे आधार बनून राहिले. त्यातच व्यंकटराव नाईक बावणेची मुलगी गजराबाईचा विवाह अक्कलकोट संस्थानचे राजे फत्तेसिंग भोसलेंशी झाला होता आणि फत्तेसिंग म्हणजे शिवरायांचे नातू शाहू महाराजांचे दत्तक किंवा मानसपुत्र असल्याने बावणे घराण्याचे वजन ध्यानात येऊ शकते. वैवाहिक संबंधांबरोबरच बावणे सरदार हे अक्कलकोट संस्थानच्या घोडदलाचे प्रमुख होते. त्यामुळे जानोजीराव, व्यंकटराव, जगजीवनराव, भगवंतराव यांनी तलवार गाजविली.

दिल्लीची मोगलशाही बुडाल्यानंतर मराठ्यांचा शत्रू म्हणजे हैदराबादचा निजाम असून त्याच्यासोबत मराठ्यांनी खर्डा, राक्षसभुवन, उदगीर यांसारख्या महत्वपूर्ण लढाया केल्या. या प्रत्येक लढाईत मराठय़ांनी बाजी मारली. महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक लढाईत बावणे सरदारांनी आपला पराक्रम दाखविला. १७६० ला दिल्लीपलीकडे अहमदशहा अब्दाली दिल्ली जिंकू पाहात होता. चौथाई आणि सरदेशमुखी मराठय़ांकडे असल्याने दिल्लीच्या रक्षणाची जबाबदारी आपल्यावर होती. त्याच वेळी इकडे निजाम कुरापती काढत होता. भाऊसाहेब पेशव्यांच्या नेतृत्वाखाली निजामाच्या फौजेला मराठ्यांनी उदगीर या ठिकाणी धूळ चारली. याचे कारण म्हणजे बीड, धारूर, औसा या परिसरातून जाणाऱ्या फौजेला जानोजीराक बावणेंनी रस्त्यातच गाठल्याने हा विजय सोपा झाला. शेवटी हैदराबादचा निजाम सलबतजंगाने शरणागती पत्करून मराठ्यांना ६० लक्षाचा मुलुख देऊन तह स्वीकारला. या वेळी हा तह तांदुळज्याच्या बावणेंच्या गढीत झाला तेव्हा सलाबतजंगाने तहाचा कोरा कागद सही करून जानोजीरावांकडे दिला. याकरून मराठी सत्तेत बावणेंचे महत्व ध्यानात येऊ शकते.

राक्षसभुवन, खर्डा, गुर्रमकोंडा अशा अनेक लढायांत त्यांनी भाग घेऊन स्वराज्याची सेवा केली. तांदुळजा या ठिकाणी बावणेंचे वास्तव्य असल्याने या परिसराची जहागिरी त्यांच्याकडे होती. त्यामुळे त्यांच्या गढीपासून शेतापर्यंत सर्वकाही ऐतिहासिक आहे. निजामाबरोबरच्या युद्धात शत्रूची खंडीने शीर म्हणजे मुंडकी ज्या परिसरात पडली त्याला नाव आहे शिरखंडी. पाण्यासाठी बारक, घोड्यांना चरण्यासाठी मसला वगैरे गावची जमीन कुरणासाठी ठेवलेली होती. बावणे घराणे तलवारीबरोबरच घोडे व इतर कलाकारीमध्ये फार पुढचे असून त्यांच्या वंशजाकडे अनेक रंगीत कलाकुसरीची चित्रे उपलब्ध असून त्यावेळच्या चित्राची किंमत दिली आहे. त्यामध्ये भाऊसाहेब व्यंकाराव बावणे हे घोड्यावर बसल्याचे रेखीव चित्र आहे.

आजतागायत बावणे घराण्याचा विस्तृत इतिहास लिहिला गेला नाही. मराठवाड्यात निजामांची प्रबळ सत्ता असताना तांदुळज्यासारख्या दुर्गम भागात वस्ती करून मराठ्यांची सेवा केली. त्यामुळे ते मराठवाड्यातील छत्रपती घराण्याचे सर्वात मोठे सेनापती ठरतात. तांदुळजा, गिरवली, अक्कलकोट, बाकणेपिंपरी अशा अनेक गावांत बावणे घराण्याने आपल्यापरीने लोकसेवा बजावली. पुढे १९४६ ला हैदराबाद मुक्तिसंग्रामात रझाकाराच्या विरोधात स्वा. सै. अण्णासाहेब बावणे यांनी मोठा लढा उभा केला होता. आज आपापल्यापरीने बावणे घराणे लोकशाहीप्रमाणे जगत असताना तांदुळजा येथील अण्णासाहेब स्वातंत्र्यसेनानी, जानोजीराव ऊर्फ बापूसाहेब उपजिल्हाधिकारी, जगदीशराव बावणे साखर कारखान्याचे संचालक बनले तर आहेत त्यात समाधान मानत धर्मराज बापूसाहेब बावणे हे जीर्ण असलेल्या गढीत मोठ्या स्वाभिमानाने राहतात. लातूर-कळंब रस्त्यावर तांदुळज्यातून पुढे जाताना नाईक-बाकणे घराण्याची गढी आहे त्या स्थितीत आपल्या पराक्रमाची साक्ष देत उभी आहे. बावणे घराण्यातील भगकंतरावांनी रचलेला श्लोक किती बोलका आहे-

बोले व्यंकट सर्ग पंचम असे सद्बुद्धि सद्भावने।
मालोजी मम तात ‘राक’ म्हणति नाईक त्या बावणे।।

[email protected]