लेख : सोलापूरचे चित्रकला महाविद्यालय

7

>> भगवान परळीकर

सोलापूर शहरातील विद्यार्थ्यांना चित्रकलेतील उच्च शिक्षणाची सोय नसल्यामुळे ते वंचित राहत होते ही उणीव जाणून संगमेश्वर महाविद्यालयाच्या निसर्गसंपन्न वातावरणात 2000मध्ये कर्मयोगी कै. आप्पासाहेब काडादी चित्रकला महाविद्यालयाची मुहूर्तमेढ रोवली गेली आणि सोलापूरच्या कला क्षेत्रातील विद्यार्थ्यांना उज्ज्वल भवितव्यासाठी संधी निर्माण झाली. सुमारे 100हून अधिक विद्यार्थी आज या महाविद्यालयात चित्रकलेचे शिक्षण घेत आहेत.

तज्ञ प्राध्यापक, सुसज्ज ग्रंथालय, भव्य इमारत, वसतिगृहाची सोय यामुळे पुण्या, मुंबईला जाणारा सोलापुरातील विद्यार्थी आता येथेच कलेचे धडे गिरवत आहे. या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना नामवंत कलाकाराचे कला प्रात्यक्षिक आणि मार्गदर्शन होतेच. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शिल्पकार रेम्बॉड व्हॅनगॉग तसेच मायकेल एन्जोलो यांच्या आर्ट फिल्म दाखविल्या जातात. क्यॉली डे साजरा केला जातो. राज्यस्तरीय निसर्ग चित्रण स्पर्धेचे आयोजनही केले जाते. या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय झालेल्या सॅन महोत्सवात चॅम्पियन ट्रॉफी सलग दोन वेळा मिळवली आहे. या महाविद्यालयातील नागेश इंगळे, सचिन खरात, देवेंद्र निंबर्गी, तेजस्विनी सोनवणे, पुष्कराज गोरटला, दया पटणे, रवी मंडेलू हे विद्यार्थी अंतरराष्ट्रीय स्तरावर चमकले आहेत. या महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार रामचंद्र खरटमल, सुधीर महाजन यांनीही भेट देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. शेतकऱ्यांना मदत व्हावी यासाठी जाणीव या नावाने दरवर्षी पुणे येथे आयोजित चित्रकला प्रदर्शनात विद्यार्थ्यांचा सहभाग असतो. यातील चित्र विक्रीतून शेतकऱ्यांना मदत केली जाते.   

[email protected]