अरुण जेटलींकडे संरक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त भार

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मनोहर पर्रीकरांनी राजीनामा दिल्यानंतर संरक्षण खात्याचा अतिरिक्त भार देण्यात आला आहे. गोवा राज्याच्या मुख्यमंत्री पदासाठी मनोहर पर्रीकरांची निवड झाल्यानंतर पर्रीकरानी आपला राजीनामा राष्ट्रपतींकडे सोपवला होता. राष्ट्रपतींनी पर्रीकर यांचा राजीनामा स्वीकारला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर चर्चा करण्यासाठी रविवारी झालेल्या बैठकीनंतर पर्रीकर यांना पुन्हा एकदा गोव्यात पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे त्यांच्याकडील संरक्षण खाते काढून अर्थमंत्री अरुण जेटली यांना अतिरिक्त भार देण्यात आला आहे. 

गोव्यात भाजपला मोठा फटका बसला असून खुद्द मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे मुख्यमंत्री म्हणून पर्रीकर यांचीच निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यानंतर पर्रीकर यांनी राज्यपालांची भेट घेत सरकार बनवण्याचा दावा केला. पर्रीकर यांनी २१ खासदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. त्यानंतर उद्या मंगळवारी मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.