‘आप’चे एकला चलो रे, २०१९च्या निवडणुकीपूर्वी घेतला मोठा निर्णय

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

२०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पार्टीने (आप) मोठा निर्णय घेतला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी २०१९ मधील निवडणुकीसाठी आम आदमी पार्टी कोणत्याही गठबंधनात सहभागी न होणार नाही असे स्पष्ट केले आहे. आम्ही एकट्याने निवडणूक लढवणार आहोत असेही ते म्हणाले. हरयणाच्या जिंद जिल्ह्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. ‘आज तक’ने याबाबत वृत्त दिले आहे.

केजरीवाल म्हणाले की, ज्या पार्टी महागठबंधनात सहभागी होत आहे त्यांची देशाच्या विकासामध्ये कोणतीही भूमिका नाही. तसेच केंद्रावर हल्ला करताना ते म्हणाले की, केंद्र सराकारने दिल्लीच्या विकासावर अडथळे निर्माण केले आहेत. दिल्लीतील विकासाच्या कामांमध्ये केंद्र सरकारने अडथळे निर्माण केल्याचे केजरीवाल म्हणाले. येथील जनतेच्या भल्यासाठी घेतलेला प्रत्येक निर्णयात मोदी सरकारने आडकाठी निर्माण केल्याचा आरोप त्यांनी लगावला.

हरयाणा सरकारवर निशाणा
यावेळी बोलताना केजरीवार यांनी हरयाणातील भाजप सरकारलाही टार्गेट केले. दिल्लीच्या तुलनेत हरयाणाचा विकास कमी झाला आहे. विकास कसा करायवयाचा ते आमच्याकडून शिका असा सल्लाही त्यांनी हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांना दिला.