‘आप’ची दक्षिणेत मोर्चेबांधणी

सामना ऑनलाईन, चेन्नई

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दाक्षिणात्य अभिनेता कमल हसन यांची आज चेन्नईत भेट घेतली. दक्षिणेत ‘आप’कडून मोर्चेबांधणी सुरू असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. कमल हसन यांनी राजकारणात प्रवेश दिल्याचे संकेत दिल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांची गुरुवारी भेट घेतली.

केजरीवालांच्या स्वागतासाठी चेन्नई विमानतळावर कमल हसन यांची छोटी मुलगी अक्षरा हसन ही उपस्थित होती. त्यानंतर केजरीवाल यांनी अलवरपेट येथील यांच्या कार्यालयात हसन यांची भेट घेतली. या भेटीत दोघांनी एकमेकांची स्तुती केली. कमल हसन यांनी राजकारणात यायला हवे असे केजरीवाल यांनी भेटीनंतर बोलताना सांगितले.केजरीवाल आणि कमल हसन यांच्या भेटीमुळे तामीळनाडूतील राजकीय वर्तुळात खलबते सुरू झाली आहेत.