लायकीत राहा, केजरीवालांचा भाजप कार्यकर्त्यांना इशारा

24

सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली

नवी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी काळे झेंडे दाखवणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना राग भरला आहे. संतापलेल्या केजरीवालांनी भाजप कार्यकर्त्यांना लायकीत राहण्याचा सल्ला दिला. याशिवाय दिल्लीच्या लोकांशी पंगा न घेण्याच इशाराही त्यांनी दिला.

अरविंद केजरीवाल शनिवारी दिल्ली बवाना येथे पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनचं उद्घाटन करण्यासाठी गेले होते. यावेळी तेथे मोठ्या संख्येने भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेदेखील पोहोचले होते. केजरीवाल कार्यक्रमात येताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवण्यास सुरुवात केली. केजरीवाल यांनी बवाना येथे येणारी मेट्रो लाईन रद्द केल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला. केजरीवाल यांनी मेट्रो लाईनसाठी आर्थिक तरतूद केली नाही, ज्यामुळे ग्रामीण भागाचं मोठं नुकसान झालं, असा आरोप करत भाजप कार्यकर्त्यांनी केजरीवाल यांचा विरोध केला.

भाजप कार्यकर्त्यांचा विरोध सुरू असताना केजरीवाल व्यासपीठावर भाषण देत होते आणि समोर भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी घोषणाबाजी करत होते. भाजप कार्यकर्त्यांनी ज्यावेळी केजरीवाल यांना काळे झेंडे दाखवले त्यावेळी त्यांना कार्यकर्त्यांना लायकीत राहण्याचा सल्ला दिला. केजरीवाल पुढे म्हणाले की, ‘लायकीत राहा, दिल्लीच्या जनतेशी पंगा घेऊ नका… नाहीतर असे जोडे पडतील की स्वत:ची ओळख पटणार नाही.’

आपली प्रतिक्रिया द्या