तिसऱ्या मुलांचा मतदानाचा हक्क काढा, बाबा रामदेव यांच्या विधानावर ओवैसी चिडले

169

सामना ऑनलाईन। हैदराबाद

लोकसंख्येवर टीका करणाऱ्या योग गुरू रामदेव बाबा यांना एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी लक्ष्य केले आहे. रामदेव बाबांच्या विधानांना इतके महत्व का देता? असा सवाल त्यांनी केला आहे. रामदेव बाबा यांनी एका कार्यक्रमात देशात झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येवर चिंता व्यक्त केली होती. हिंदुस्थान लोकसंख्या विस्फोटाला सामोरे जाईल अशी स्थिती आहे, असे सांगत बाबांनी तिसऱ्या अपत्याचा मतदानाचा हक्क काढून घ्या. त्याला सरकारी नोकरीसाठी अपात्र ठरवा असे म्हटले होते.

रामदेव बाबांच्या विधानानंतर ओवैसी यांनी ट्वीट केले आहे. लोकांना असंवैधानिक वक्तव्य करण्यापासून रोखणारा कायदा अस्तित्वात नाही. मग असे असताना रामदेव यांच्या विचारांना इतके महत्व का दिले जाते आहे. ते योग करू शकतात. पण याचा अर्थ असा नाही की नरेंद्र मोदींनी फक्त ते तिसरे अपत्य असल्यामुळे मतदानाचा हक्क गमवावा, असे ओवैसी यांनी म्हटले आहे.

हरिद्वार येथे रविवारी एका संमेलनात बोलताना रामदेव बाबा यांनी अजून देश लोकसंख्या विस्फोटाचा सामना करण्यासाठी तयार नसल्याचे म्हटले होते. तसचे देशाच्या लोकसंख्येच्या आकडयाने 150 कोटीचा ओलांडता कामा नये. पण हे फक्त तेव्हाच शक्य आहे जेव्हा तिसऱ्या अपत्याला मतदानाबरोबरच इतर अधिकारांपासून वंचित केले जाईल. त्याला सरकारी नोकरी व इतर सरकारी लाभांपासून वंचित केल्यावरच शक्य असल्याचे बाबांनी म्हटले होते. त्यावर ओवैसींनी ट्वीट करत बाबांच्या विधानावर वक्तव्य केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या