
सामना ऑनलाईन । चंदिगड
एका मुस्लीम व्यक्तीची दाढी जबरदस्ती कापल्याची घटना काही गुरुग्राममध्ये घडल्यानंतर आता ऑल-इंडिया-मजलिस-ए-इत्तेहादुल-मुसलमीनचे (एमआयएम) प्रमुख, खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी हिरवे फुत्कार टाकण्यास सुरुवात केली आहे. याप्रकरणातील आरोपींना आणि त्यांच्या कुटुंबीयांना त्यांनी धमकावले आहे. त्यामुळे परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
Muslim man’s beard was shaved off. Those who did it,I am telling them & their fathers, even if you slit our throat,we’ll be Muslims.We’ll convert you to Islam & will make you keep beard: A Owaisi. Muslim man registered FIR (2 Aug) when his beard was forcibly shaved off in Haryana pic.twitter.com/MONqKeKllP
— ANI (@ANI) August 6, 2018
ज्या लोकांनी मुस्लीम व्यक्तीची दाढी जबरदस्ती कापली त्यांना आणि त्यांच्या बापांना मी सांगू इच्छितो की, (दाढीच काय) तुम्ही आमचा गळा कापला तरी आम्ही मुस्लीमच राहू. आम्ही तुम्हाला इस्लाम स्वीकारायला लावू आणि दाढी देखील ठेवायला भाग पाडू, अशी शब्दात त्यांनी या आरोपींना धमकावले आहे. ओवैसींच्या या वक्तव्यामुळे हरयाणातील राजकीय आणि धार्मिक वातावरण आणखी बिघडण्याची शक्यता आहे.
दरम्यान, २ ऑगस्ट रोजी गुरुग्रामच्या सेक्टर २९ मध्ये जफरुद्दीन युनुस याला पाकिस्तानी म्हणत अज्ञातांनी त्याच्यावर हल्ला केला आणि जबरदस्ती दाढी कापली. या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर राज्य सरकारने पोलीस यंत्रणांना सतर्क केले आहे. तसेच याप्रकरणी तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
Haryana: FIR registered in Sector 29 Gurugram, after a youth Yunus filed complaint that a couple of unidentified men forcibly shaved off his beard following an altercation.
— ANI (@ANI) August 2, 2018