आसाराम लोमटे यांना साहित्य अकादमी पुरस्कार


सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

परभणी येथील ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक आसाराम लोमटे यांना त्यांच्या ‘आलोक‘ या कथासंग्रहासाठी यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. तर कोकणी साहित्यविभागात एडविन जे. एफ. डिसोझा लिखित ‘काळे भंगार‘ हे पुस्तक साहित्य अकादमी पुरस्कारासाठी निवडण्यात आले आहे.

आलोक‘ या लघुकथा संग्रहातून आसाराम लोमटे यांनी ग्रामीण भागाचे चित्रण आपल्या लेखणीतून केले आहे. कोकणी साहित्यविभागात एडविन यांच्या ‘काळे भंगार‘ या पुस्तकासाठी निवडण्यात आले आहे. येत्या २२ फेब्रुवारीला साहित्य अकादमी पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे.