अशोक आंबेडकर यांचे निधन

सामना ऑनलाईन । मुंबई

‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू, दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे ट्रस्टी अशोक आंबेडकर यांचे आज सकाळी जे. जे. रुग्णालयात निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते.

हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. पण शस्त्रक्रिया होऊनही ते वाचू शकले नाहीत. अशोक आंबेडकर हे डॉ. आंबेडकर यांचे लाडके पुतणे मुकुंदराव यांचे पुत्र होत.

अशोक आंबेडकर यांची अंत्ययात्रा अंधेरी जे.बी. नगर, ‘आकाल’ सोसायटी येथून आज सकाळी १० वाजता निघेल. त्यांच्या पार्थिवावर ११.३० वाजता दादर चैत्यभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या