सुंगधी अष्टगंध

आठ सुवासिक द्रव्यांनी बनवण्यात आलेले गंध म्हणून त्याला अष्टगंधम्हटले जाते. या अष्टगंधामध्ये देवाला आवडणारी आठही द्रव्ये असल्यामुळे कोणत्याही पूजेत अष्टगंध वापरण्याची परंपरा आहे.

> गंधाष्टक किंवा अष्टगंधामध्ये श्रीगणेश, विष्णू, शिव, दुर्गा आणि सूर्य या पाच देवतांना संतुष्ट करणारी द्रव्ये असतात. त्यामुळे पुजेमध्ये ते वापरणे खूपच शुभ मानले जाते.

> शक्तीसाठी यात चंदन, अगर, कपूर, चोर, कुंकुम, रोचन, जटामासी, कपी ही द्रव्ये असतात, तर किष्णूसाठी यात चंदन, अगर, ह्रीकेर, कुट, कुंकुम, उशीर, जटामासी और मुर यांचा समावेश असतो.

> शिवशंकराला प्रिय असलेले चंदन, अगर, कपूर, तमाल, जल, कुंकुम, कुशीद, कुष्ट यात असतातच, पण श्रीगणेशाला प्रसन्न करून घेण्यासाठी लागणारे चंदन, अगर, कपूर, रोचन, कुंकुम, मद, रक्तचंदन, ह्रीकेर यांचा समावेश असतो. सूर्यासाठी यात जल, केसर, कुष्ठ, रक्तचंदन, चंदन, उशीर, अगर, कपूर असतात.

> धर्मशास्त्रात अष्टगन्ध तीन प्रकारचे सांगितले आहे. त्यात चंदन, अगर, कर्पूर, तमाल, जल, कंकुम, कुशीत, कुष्ठ ही आठ द्रव्ये असतात. अष्टगंध शैक समाजाला प्रिय आहे.

> प्रत्येक राशीचा ग्रहस्वामी वेगळा असतो. त्या त्या ग्रहाच्या प्रकृतीनुसार त्यांचा रंग आणि गंध असतो. या वेगवेगळ्या राशींनुसार गंधाचा टिळा कपाळाला लावला तर आपल्या इच्छा पूर्ण होतात असं म्हटलं जातं. सर्व समस्या दूर होतात.