Asia cup 2018 : हिंदुस्थानने पाकिस्तानचा 9 विकेट्ने धुव्वा उडवला


सामना ऑनलाईन । दुबई

आशिया कप स्पर्धेतीत सुपर फोरमधील दुसऱ्या सामन्यात हिंदुस्थानने पाकिस्तानचा 9 विकेट्ने धुव्वा उडवला. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 7 बाद 237 धावा करत हिंदुस्थानपुढे विजयासाठी 238 धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान हिंदुस्थानने 39.3 षटकात एका गड्याच्या मोबदल्यात पूर्ण केले. हिंदुस्थानकडून शिखर धवनने 114 आणि रोहित शर्माने नाबाद 111 धावांची शतकी खेळी साकारली. या दोघांमध्ये 210 धावांची सलामीची भागीदारी झाली. धावांचा पाठलाग करताना हिंदुस्थानच्या सलामीविरांची ही सर्वोच्च भागीदारी आहे.

लाईव्ह अपडेट – 

 • एक दिवसीय क्रिकेटमधील 19 वे शतक
 • 106 चेंडूत 7 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने शतक
 • धवनपाठोपाठ रोहित शर्माचं शतक
 • शतकानंतर शिखर धवन 114 धावांवर बाद

 • हिंदुस्थानच्या 200 धावा पूर्ण
 • 95 चेंडूत केले शतक पूर्ण
 • धवनचे एक दिवसीय कारकीर्दीतील 15 वे शतक
 • शिखर धवनचे शतक, चौकार ठोकून केले शतक पूर्ण

 • रोहित शर्माच्या एक दिवसीय क्रिकेटमधील 7 हजार धावा पूर्ण

 • 30 षटकानंतर हिंदुस्थानच्या बिनबाद 179 धावा
 • हिंदुस्थानच्या 150 धावा पूर्ण
 • 25 षटकानंतर हिंदुस्थानच्या बिनबाद 138 धावा
 • रोहितचे एक दिवसीय कारकीर्दीतील 37 वे अर्धशतक
 • आशिया कपमधील सलग तिसरे अर्धशतक
 • रोहित शर्माचे अर्धशतक

 • 20 षटकानंतर हिंदुस्थानच्या बिनबाद 107 धावा
 • हिंदुस्थानच्या 100 धावा पूर्ण
 • धवनचे एक दिवसीय क्रिकेटमधील 26 वे अर्धशतक
 • शिखर धवनचे अर्धशतक

 • 15 षटकानंतर हिंदुस्थानच्या बिनबाद 72 धावा
 • 10 षटकानंतर हिंदुस्थानच्या बिनबाद 53 धावा
 • हिंदुस्थानची दमदार सुरुवात, 50 धावा पूर्ण
 • पाच षटकानंतर हिंदुस्थानच्या बिनबाद 23 धावा
 • शिखर धवन आणि रोहित शर्मा मैदानात
 • हिंदुस्थानचा डाव सुरू
 • हिंदुस्थानसमोर 238 धावांचे आव्हान
 • बुमराह, चहल आणि कुलदीपच्या प्रत्येकी तीन विकेट्स
 • पाकिस्तानच्या 50 षटकात 7 बाद 237 धावा
 • पाकिस्तानला सातवा धक्का

 • 45 षटकानंतर पाकिस्तानच्या 6 बाद 211 धावा
 • आसिफ अली 30 धावांवर बाद, चहलने घेतला दुसरा बळी
 • पाकिस्तानला सहावा धक्का

 • शोएब मलिक 78 धावांवर बाद, बुमराहने घेतला बळी
 • पाकिस्तानला पाचवा धक्का
 • पाकिस्तानच्या 200 धावा पूर्ण
 • 40 षटकानंतर पाकिस्तानच्या 4 बाद 169 धावा
 • सरफराज अहमद 44 धावांवर बाद, कुलदीप यादवने घेतला दुसरा बळी
 • पाकिस्तानला चौथा धक्का

 • पाकिस्तानच्या 150 धावा पूर्ण
 • दोघांमध्ये 100 पेक्षा जास्त धावांची भागिदारी
 • शोएब मलिक आणि सरफराज अहमद जोडी जमली
 • 35 षटकानंतर पाकिस्तानच्या 3 बाद 141 धावा
 • एकदिवसीय क्रिकेटमधील 43 वे अर्धशतक
 • शोएब मलिकचे अर्धशतक

 • 30 षटकानंतर पाकिस्तानच्या 3 बाद 116 धावा
 • पाकिस्तानच्या 100 धावा पूर्ण
 • 25 षटकानंतर पाकिस्तानच्या 3 बाद 92 धावा
 • 20 षटकानंतर पाकिस्तानच्या 3 बाद 71 धावा
 • बाबर आझम नऊ धावांवर बाद
 • पाकिस्तानला तिसरा धक्का

 • 15 षटकानंतर पाकिस्तानच्या 2 बाद 56 धावा
 • फखर जमान 31 धावांवर बाद, कुलदीप यादवने घेतला बळी
 • पाकिस्तानला दुसरा धक्का

 • पाकिस्तानच्या 50 धावा पूर्ण
 • 10 षटकानंतर पाकिस्तानच्या 1 बाद 28 धावा
 • बाबर आझम फलंदाजीसाठी मैदानात
 • ईमान-उल-हक 10 धावांवर बाद, चहलने घेतला बळी
 • पाकिस्तानला पहिला धक्का

 • 5 षटकानंतर पाकिस्तानच्या बिनबाद 15 धावा
 • पाकिस्तानची सावध सुरुवात
 • 1 षटकानंतर पाकिस्तानच्या बिनबाद 7 धावा
 • पाकिस्तानचा डाव सुरू, फखर जमान आणि ईमान-उल-हक मैदानावर
 • हिंदुस्थानचा संघ – 

 • पाकिस्तानचा संघ –

 • नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय
 • पाकिस्तानने नाणेफेक जिंकला

 • थोड्याच वेळात नाणेफेक