आशियाई ऍथलेटिक्स स्पर्धा, गोळाफेकपटू ताजिंदर सिंगला सुवर्ण

2

सामना ऑनलाईन,नागपूर

गोमती मरिमुथू (800 मीटर धावणे) हिच्या सोनेरी यशानंतर गोळाफेकपटू ताजिंदरसिंग तूर यानेही सोनेरी यश संपादन करून हिंदुस्थानला दुसरे सुवर्णपदक जिंकून दिले.

राष्ट्रीय विक्रमवीर ताजिंदरने खलिफा स्टेडियमवर रंगलेल्या अंतिम फेरीत पहिल्याच प्रयत्नात 20.22 मीटर गोळाफेक करत सुकर्णपदकावर आपले नाव कोरले. 24 वर्षीय ताजिंदरची 20.75 अशी सर्वोत्तम कामगिरी असल्याने स्पर्धेपूर्वी त्यालाच सुवर्णपदकाचे दावेदार मानले जात होते. त्यानेही आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करत चाहत्यांना निराश केले नाही.

शिवपाल सिंगने पुरुषांच्या भालाफेक प्रकारात रौप्यपदकाची कमाई हिंदुस्थानला तिसरे पदक जिंकून दिले. शिवपालने 86.23 मीटर भाला फेकून सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये याच मैदानावर होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील आपले स्थान निश्चित केले. जबीर मदारी पल्लियाली आणि सरिताबेन गायकवाड यांनी अनुक्रमे पुरुष आणि महिलांच्या 400 मीटर अडथळा शर्यतीत कास्यपदकांची कमाई केली.