हीना सिद्धूला नेमबाजीत कास्यपदक

सामना ऑनलाईन ,जकार्ता

जकार्ता इंडोनेशियात सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत हिंदुस्थानची स्टार नेमबाज हींना सिद्धूने दहा मीटर एअर पिस्तूल प्रकारात कास्यपदकाकर निशाणा साधला. तिच्या कास्य कामगिरीमुळे हिंदुस्थानला नेमबाजीतील नववे पदक मिळाले.

आशियाई स्पर्धेत हिंदुस्थानच्या नेमबाजांनी पहिल्या दिवसापासून पदकांची लयलूट सुरूच ठेवल्यामुळे सहाजिकच शुक्रवारीही 16 वर्षीय मनू भाकेर आणि अनुभवी हींना सिद्धू यांच्या कामगिरीवर देशवासीयांच्या नजरा खिळल्या होत्या. मात्र दहा मीटर एअर पिस्तूल प्रकारात दोघींचीही सुरुकात खराब झाल्याने पदकाच्या आशा धुसर झाल्या होत्या. तरीही हींना सिद्धूने शेकटच्या फेऱ्यांमध्ये आपला संपूर्ण अनुभव पणाला लावत पुनरागमन केले आणि 219.2 गुणांसह कास्यपदकाला गवसणी घातली. चीनच्या कियान वांगने 240.3 गुणांसह ‘सुवर्ण’वेध साधला, तर कोरियाच्या किम मिनजुंग हिने 237.6 गुणांसह रौप्यपदक जिंकले. राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती मनू भाकेर पाचव्या स्थानी राहिली.

रोइंगमध्ये पदकांची हॅटट्रिक

आशियाई क्रीडा स्पर्धेतील नौकानयन प्रकारात हिंदुस्थानने सांघिक प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली. त्याआधी सकाळच्या सत्रात पुरुषांच्या लाइटवेट सिंगल स्कल्स प्रकारात, तर पुरुषांच्याच लाइटवेट डबल स्कल्स प्रकारातही हिंदुस्थानने कास्यपदकांची कमाई केली.

हॅण्डबॉलमध्ये हिंदुस्थानचा पाकिस्तानकर विजय

हिंदुस्थानने आशियाई क्रीडा स्पर्धेतील हॅण्डबॉलमध्ये पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर शेवटच्या सेकंदात 28-27 असा विजय मिळवून आगेकूच केले.

स्क्वॉशमध्ये तीन पदके निश्चित

हिंदुस्थानी संघ आशियाई क्रीडा स्पर्धेत पदकांची लयलूट करीत असून उद्याही पदकतालिकेत यामध्ये भर पडणार आहे. स्क्वॉश या खेळामध्ये हिंदुस्थानला तीन पदके मिळणार हे निश्चित झाले आहे. सौरव घोषाल, जोश्ना चिनप्पा व दीपिका पल्लीकल यांनी उपांत्य फेरीत धडक मारल्यामुळे त्यांचे किमान कास्य पदक पक्के झाले.
-हिंदुस्थानच्या पुरुषांच्या हॉकी संघाने जपानचा 8-0ने धुव्वा उडवला.

प्रजनेश गुणेश्वरनला कास्य

हिंदुस्थानच्या प्रजनेश गुणेश्वरनला आशियाई क्रीडा स्पर्धेत टेनिसमधील पुरुष एकेरीच्या उपांत्य लढतीत उझबेकिस्तानच्या डेनिस इस्टोमिनने 6-2, 6-2 असे हरवले. या पराभवाबरोबर प्रजनेशला कास्यपदक मिळाले. याआधी हिंदुस्थानला तब्बल आठ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आशियाई क्रीडा स्पर्धेतील टेनिसमध्ये सुवर्णपदक मिळाले. रोहन बोपण्णा व दिवीज शरण जोडीने पुरुष दुहेरीत हा पराक्रम केला.