राहुल आवारे पोलीस उपअधीक्षक,ललिता बाबर उपजिल्हाधिकारी

सामना ऑनलाईन, मुंबई

राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात राज्याचे नाव उज्ज्वल केल्याबद्दल राज्य सरकारने 32 खेळाडूंची थेट शासकीय सेवेत नियुक्ती केली आहे. प्रसिद्ध अॅथलीट ललिता बाबर यांची राज्याच्या महसूल व वन विभागात उपजिल्हाधिकारी म्हणून तर कुस्तीपटू राहुल आवारे यांची पोलीस उपअधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

ऑलिम्पिकपटू ललिता बाबरचा विवाहसोहळा संपन्न

महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केल्याबद्दल गुणवान खेळाडूंची थेट शासकीय सेवेत नियुक्ती करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यानुसार शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने 32 खेळाडूना थेट नियुक्तीचा शासन निर्णय आज जाहीर केला. पॉवरलिफ्टर अमित निंबाळकर यांची महसूल व वन विभागात नायब तहसीलदार म्हणून नियुक्ती केली आहे. उर्वरित 29 खेळाडूंना शालेय शिक्षण व क्रीडा विभागात नोकरी दिली आहे. त्यात नऊ दिव्यांग खेळाडूंचा समावेश आहे.