पदकांची लयलूट,हिंदुस्थानची सिल्व्हर ज्युबिली

सामना ऑनलाईन, जाकार्ता

हिंदुस्थानी खेळाडूंची आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदकांची लयलूट शुक्रवारीही सुरूच राहिली. हिंदुस्थानच्या शिलेदारांनी टेनिस, रोइंग (नौकानयन), नेमबाजी, कबड्डी या खेळांमधून सहाव्या दिवशी दोन सुवर्ण, एक रौप्य व चार कास्यपदकांवर मोहोर उमटवली. याचसोबत हिंदुस्थानने आशियाई क्रीडा स्पर्धेत पदकांची सिल्व्हर ज्युबिलीही साजरी केली. यामध्ये सहा सुवर्ण, पाच रौप्य व चौदा कास्यपदकांचा समावेश आहे.