Asian Games 2018 – महिला हॉकीपटूंनी उडवला कझाकस्तानचा 21-0 ने धुव्वा

सामना ऑनलाईन । जकार्ता

जकार्तामध्ये सुरू असलेल्या 18 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत हिंदुस्थानी हॉकी संघाने कझाकस्तानचा 21-0 ने धुव्वा उडवून मोठ्या विजयाची नोंद केली आहे. हिंदुस्थानचा हा सलग दुसरा विजय आहे. याआधी पहिल्या सामन्यात हिंदुस्थानने यजमान इंडोनेशियाला 8-0 असे पराभूत केले होते.

हिंदुस्थानची ‘गोल्डन हॅट्रिक’; सौरभ चौधरीनं जिंकलं सुवर्ण
हिंदुस्थानला आणखी एक रौप्य, नेमबाज संजीव राजपूतची जबरदस्त कामगिरी

मंगळवारी झालेल्या या सामन्यात हिंदुस्थानी महिला हॉकीपटूंनी प्रत्येक क्वॉर्टरमध्ये गोलचा पाऊस पाडला. हिंदुस्थानकडून नवनीत कौरने सर्वाधिक पाच गोल केले. कौरने 11 व्या, 12 व्या, 16 व्या आणि 48 व्या मिनिटाला(2 गोल) गोल केले. तर गुरजीत कौरने गोलचा चौकार ठोकला. तिने 8 व्या, 36 व्या, 44 व्या आणि 51 व्या मिनिटाला गोल केले. यासह लालरेमसियामी आणि वंदनाने प्रत्येकी 3-3 गोल केले, तर लिलिमाने दोन गोल केले. तसेच नेही, उदिता, दीप ग्रेस, नवज्योत आणि मोनिकाने प्रत्येका 1 गोल करत विजयात सिंहाचा वाटा उचलला.

यापूर्वी सोमवारी पुरूष हॉकी संघाने यजमान इंडोनेशियाला 17-0 असे पराभूत केले होते. पहिल्याच सामन्यात विक्रमी विजय मिळवल्याने पुरूष हॉकी संघाला आत्मविश्वास नक्कीच उंचावला असणार.