पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धा; हरविंदरचा ‘सुवर्ण’ भेद


सामना ऑनलाईन । जकार्ता

जकार्ता येथे सुरू असलेल्या पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत हिंदुस्थानची चमकदार कामगिरीच सुरूच आहे. बुधवारी हरविंदर सिंहने देशाला सातवे सुवर्णपदक जिंकून दिले. हरविंदरने पुरुषांच्या वैयक्तिक रिकर्व खुल्या तिरंदाजी (डब्ल्यू 2/एसटी) स्पर्धेत ‘सुवर्ण’भेद साधला. याक्यतिरिक्त मोनू घांगसने थाळीफेकमध्ये रौप्य, तर मोहम्मद यासिरने गोळाफेकीमध्ये कास्यपदकाची कमाई केली.

हरविंदर सिंहने सुवर्णपदकाच्या लढतीत चीनच्या झाओ लिझुयेचा  6-0 असा दारुण पराभव केला. आशियाई स्पर्धेत तिरंदाजीच्या वैयक्तिक प्रकारात हे हिंदुस्थानचे पहिले सुवर्णपदक होय. मोनू घांगसने अंतिम प्रयत्नात 35.89 मीटर लांब थाळी फेकत रौप्यपदकाकर मोहर उमटवली. इराणच्या ओलाद मेहदीने 42.37 मी. लांब थाळी फेकत सुकर्णपदक पटकावले. गोळाफेकीत हिंदुस्थानच्या मोहम्मद यासिरला कझाकिस्तान आणि चीनच्या खेळाडूची झुंज मोडता आली नाही. 14.22 मीटर लांब गोळा फेकल्यामुळे मोहम्मदला कास्यपदकाकर समाधान मानाके लागले.