विदेशातील पैसा घेऊन कश्मीर खोरे पेटवले, फुटीरतावादी नेत्या आसियाची कबुली

62

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

विदेशातून आलेल्या पैशांच्या जोरावर जम्मू-कश्मीर खोऱ्यात अस्थिरता माजवण्याची कबुली फुटीरतावादी नेत्या आसिया अंद्राबी यांनी दिली आहे. विदेशातील पैशाच्या जोरावर स्थानिक महिलांना फितूर बनवून लष्करी जवान आणि सरकारविरोधात प्रदर्शन घडवून आणल्याचे अंद्राबी यांनी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) चौकशीमध्ये सांगितले. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे.

फुटीरतावादी नेत्या आसिया अंद्राबी यांची एनआयएकडून चौकशी सुरू आहे. या चौकशीदरम्यान त्यांनी विदेशातील स्त्रोतांकडून खोऱ्यात अस्थिरता माजवण्यासाठी फंड जमा करत असल्याची कबुली दिली. विदेशातून आलेल्या पैशांच्या जोरावर दुखतारन-ए-मिल्लत या त्यांच्या संस्थेच्या मदतीने मुसलमान महिलांना आंदोलनासाठी रस्त्यावर उतरवत होती.

एनआयने दिलेल्या माहितीनुसार, अंद्राबी या विदेशी फंड जमा करणाऱ्या जहूर वटाली (अहमद शाह) याच्या संपर्कात होती. वहाटी हा तो पाकिस्तानकडून फंड जमा करतो आणि वेगवेगळ्या देशात हवाला मार्गाने पैसा पाठववतो. तसेच एनआयने यादरम्यान मुस्लिम लीगचा नेता मसरत आलाम याचाही हवाला दिला आहे. आलम याने एनआयएच्या अधिकाऱ्यांना सांगितले की, पाकिस्तानचे समर्थन असणारा एजंट विदेशातून हवाला मार्गाने पैसा जमा करतो आणि हवाला ऑपरेटर्सच्या मदतीने जम्मू-कश्मीरमध्ये पाठवतो.

आपली प्रतिक्रिया द्या