पद्मावत, राझीला मागे सारत व्हिलेज रॉकस्टारला ऑस्कर नामांकन

26


सामना ऑनलाईन । मुंबई

चित्रपट जगतातला मानाचा पुरस्कार सोहळा मानला जाणाऱ्या ऑस्करची नामांकने जाहीर झाली आहेत. यंदा हिंदी भाषेतून तब्बल सात चित्रपट शर्यतीत असताना या सगळ्यांना मागे टाकत ‘व्हिलेज रॉकस्टार’ या आसामी भाषेतील चित्रपटाने बाजी मारली आहे. व्हिलेज रॉकस्टार या चित्रपटाचं दिग्दर्शन रीमा दास या दिग्दर्शिकेने केलं आहे.

2019च्या ऑस्कर सोहळ्यासाठी हिंदुस्थानातून २८ चित्रपट या शर्यतीत होते. यात हिंदीतल्या सात चित्रपटांचा समावेश होता. त्यात प्रामुख्याने मेघना गुलजार दिग्दर्शित राझी, संजय लीला भन्साळी दिग्दर्शित पद्मावत आणि नंदिता दास दिग्दर्शित मंटो या चित्रपटांचा समावेश होता. राझी, पद्मावत आणि मंटोसह ऑक्टोबर, लव्ह सोनिया, पॅडमॅन आणि 102 नॉट आऊट हे चित्रपटही या शर्यतीत होते. मराठीतले न्यूड, बोगदा, गुलाबजाम हे चित्रपटही या स्पर्धेत होते. मात्र, या सगळ्यांना मागे सारत आसामीतील व्हिलेज रॉकस्टार या चित्रपटाने ऑस्करचं नामांकन पटकावलं आहे.

summary- Assame movie village rockstar got nominated for oscar

आपली प्रतिक्रिया द्या