मेष

4067

“मनुष्य केवढाही प्रतिष्ठेने व संपत्तीने वैभवशाली असो पण एकदा का तो दुर्गणांच्या तावडीत सापडला की त्याचे सर्व वैभव असून नसल्यासारखे असते.’’

मेष व्यक्तींना कसोटीचा कालावधी आहे. योग्य व्यक्तीचा सल्ला तुम्ही तुमच्या क्षेत्रात असाल तेथे घेतला पाहिजे. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत तुमचे डावपेच नाकाम ठरविण्याचा प्रयत्न विरोधक करतील. काही विरोधक तुमच्याशी मैत्रीसुद्धा करतील. त्यामुळे मनातील गुप्त विचार उघड करणे योग्य ठरणार नाही. व्यवसायात भागीदारीत ताणतणाव वाढेल. ३ ऑक्टोबर २०१६, नोव्हेंबर, मार्च व जुलैमध्ये फसगत होईल. पैसा सांभाळा. एकदम मोठा फायदा होईल या भ्रमात राहू नका. स्वतःच्या बुद्धीने व संयमाने या वर्षात तुम्हाला महत्त्वाचे निर्णय घ्यावयाचे आहेत. क्षेत्र कोणतेही असो कसोटीचा कालावधी असला तरी तुमच्या जुन्या अनुभवांचा मात्र जरूर उपयोग करा. कायद्याचे मान ठेवा. कौटुंबिक ताणतणाव असतील. वाटाघाटीत तुमच्यावर आरोप येतील. २० जानेवारी २०१७ व २७ ऑगस्ट प्रकृतीची काळजी घ्या. ऑपरेशन, दुखापत संभवते. प्रवासात सावध रहा. सविस्तर विचार पुढे येईलच.

राजकीय-सामाजिक क्षेत्र:

राजकीय-सामाजिक क्षेत्रांत या वर्षात तुमचे डावपेच यशस्वी होण्यासाठी जास्त संघर्ष करावा लागेल. वेळ पडल्यास माघारही घ्यावी लागेल. डिसेंबर, एप्रिलमध्ये तुमच्या विरोधात फार मोठे राजकारण खेळले जाईल. तुमचे मोठे गुपित उघड होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत ज्या माणसाला मदत केली त्यामुळेसुद्धा तुम्हाला समस्या निर्माण होऊ शकते. जानेवारीत शनीचे वक्रीभ्रमण तुमच्या फायद्याचे ठरेल. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, मे व जूनमध्ये तणाव कमी होईल. विरोधकांच्या चुका दाखवता येतील. लोकसंग्रह नव्याने तयार करून नव्या पद्धतीची खेळी खेळता येईल. ऑक्टोबर, जानेवारी व ऑगस्टमध्ये विरुद्धलिंगी व्यक्तीकडून मनस्ताप होईल. कोर्टकचेरीच्या कामात सावध रहा. कुणाच्या मदतीची अपेक्षा जास्त ठेवू नका. अहंकार न ठेवता कार्य चालू ठेवा. पुढील सप्टेंबर २०१७ तुमच्यासाठी फारच महत्त्वाचा ठरेल.

नोकरी-व्यवसायः

ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये नोकरीची संधी मिळेल. तुमचा स्वभाव इतरांना मदत करण्याचा आहे. या वर्षात मात्र हे सर्व करताना काळजी घ्या. दुसऱयांनी केलेल्या चुका तुमच्यावर टाकल्या जातील. निष्कारण वैमनस्य वाढेल. आर्थिक उलाढाली करताना फाजील आत्मविश्वास घातक ठरेल. जानेवारी, जूनमध्ये तणाव व वाद वाढेल. रागावर नियंत्रण ठेवा व प्रवासात सावध रहा. व्यवसायात ऑक्टोबर, नोव्हेंबर व मार्चमध्ये गुंतवणूक करताना काळजी घ्या व खरेदी-विक्रीच्या व्यवहारात घाई करू नका. फसगत टाळा. जानेवारी, फेब्रुवारी व मे, जूनमध्ये बढती व बदलीचा फायदा होईल. व्यवसायासाठी या काळात भागीदार मिळतील. जास्त हव्यास न ठेवता कष्ट घ्या. शेतकरी वर्गाला हे वर्ष थोडे कसोटीचेच आहे. सप्टेंबरनंतर तुमचे मनोरथ पूर्ण होईल.

विद्यार्थी व तरुण वर्गासाठी:

तुमचा उत्साह व आत्मविश्वास प्रबळ असतो. मैत्रीत तुम्ही वाहवत गेल्यास अडचणीत याल. योग्य संगत ठेवणे गरजेचे आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबर, जानेवारी, फेब्रुवारीमध्ये परीक्षेत यश मिळेल. कष्ट घ्यावयाचेच आहेत. जानेवारी, मार्चमध्ये वाहनापासून धोका होईल. प्रेमाच्या फंदात पडणे त्रासदायक ठरेल. पैसा मिळवण्याच्या नादाने भलत्याच चक्रात अडकाल. त्यामुळे काळजी घ्या. निराश होण्यापेक्षा हिंमत ठेवा. रात्रीनंतर नेहमी पहाट येतच असते. आहे तेच क्षेत्र ठेवून मेहनत घ्या.

महिलावर्गासाठी:

दुसऱयाला मदत करण्याचा तुमचा स्वभाव आहे. स्वतःहून दुसऱयाचे जबाबदारीचे काम स्वतःकडे घेता. नोकरीत नोव्हेंबर, डिसेंबर, मार्च, एप्रिलमध्ये सावध रहा. चूक होऊ शकते. शेजारी, आप्तेष्ट यांच्याबरोबर गैरसमज होऊ शकतो. जानेवारी, मेमध्ये तणाव होऊ शकतो. स्वतःची प्रकृती सांभाळा. प्रवासात दुखापत संभवते. व्यवसायात जास्त मेहनत घ्यावी लागेल. दुसऱयावर विश्वास टाकणे धोक्याचे ठरेल. ऑगस्ट, मार्च, जुलैमध्ये आर्थिक व्यवहारात सावध रहा. दुसऱयाला जामीन रहाणे टाळावे. संयमाने, शांत विचाराने समस्या सोडवा. पुढील दिवाळी उन्नतीची असेल.

आपली प्रतिक्रिया द्या