भविष्य

समस्या – प्रयत्न करूनही नोकरी मिळत नसेल तर…

तोडगा – दररोज सकाळी मारुतीची पूजा करून, हनुमान चालीसा वाचा. यश मिळेल.

मेष – गैरसमज दूर होतील

वस्तुस्थिती जाणून घेतल्याखेरीज कोणत्याही निर्णयाप्रत येऊ नका. जवळची व्यक्ती काहीसे वेगळे वागताना आढळेल. पण तिला विश्वासात घ्या. गैरसमज दूर होतील. कामाच्या ठिकाणी वातावरण चांगले राहील. कामात गांभीर्याने लक्ष घाला. निळा रंग जवळ बाळगा. शुभ आहार…रानभाज्या, नैसर्गिक पदार्थ.

वृषभ – आर्थिकदृष्टय़ा फायदा

 कौटुंबिक जबाबदाऱया वाढतील. त्याचे दडपण घेण्याचे कारण नाही. कुटुंबाच्या साथीने तुम्ही त्या जबाबदाऱया सहज पार पडाल. आर्थिकदृष्टया फायद्यात राहाल. आशा आकांक्षाना मुरड घालू नका. नव्या कल्पनांचा जन्म त्यातूनच होणार आहे. पिवळा रंग महत्वाचा.  शुभ आहार…डाळी, कडधान्ये

मिथुन – कौतुक होईल

स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाविषयी सजग राहा. तुमच्या मनमिळाऊ स्वभावाचे कौतुक होईल. तुमची मदत महत्त्वाचे काम करणार आहे. त्यामुळे दुसऱयांना मदत आवर्जून करा. त्यात तुम्हालाही भविष्यकालीन फायदा होईल. पांढरा रंग जवळ बाळगा.शुभ आहार…भोपळी मिरची, हिरव्या भाज्या

कर्क – ताजेतवाने वाटेल

बारीक सारीक दुखण्यातून सुटका होईल. त्यामुळे एकदम ताजेतवाने वाटेल. व्यवसाय धंद्यात उधार उसनवारी टाळा. कामावर लक्ष केंद्रित करा. नवे भागीदार मिळतील. त्यामुळे फायदा होईल. कायदेशीर सल्ल्यासाठी चांगला आठवडा. मोतिया रंग जवळ ठेवा. शुभ आहार…भात, दूध, पोहे

सिंह – आनंदी राहा

घरातील आलिशान वस्तूंच्या खरेदीसाठी अतिखर्च करणे टाळा. चिंता विसरून जा. आनंदी राहायला शिका. बारीक सारीक गोष्टींचा ताण घेऊ नका. सगळी कामे मार्गी लागणार आहेत. घरातील वादविवादांकडे दुर्लक्ष करा. नव्या उद्योगात पैसे गुंतवा. फायदा होईल. लाल रंग महत्त्वाचा. शुभ आहार… थंड पदार्थ, टाक, शहाळ्याचे पाणी

कन्या – मित्रांची मदत

या आठवडय़ात तुम्हाला अफलातून, नव्या कल्पना सुचतील. तुमच्या कल्पनाशक्तीला धुमारे फुटतील. त्यातून आर्थिक लाभ संभवतो. मित्रांची मदत होईल. ते तुम्हाला आनंदी ठेवतील. आवडत्या व्यक्तीशी होणारी भेट खूपच फलदायी ठरेल. अबोली रंग जवळ बाळगा. शुभ आहार…कोकमाचे सार, नारळाची चटणी

तूळ – आनंद मिळेल

रागावर नियंत्रण ठेवा. आवाक्याबाहेर कामे अंगावर घेऊ नका. मोजक्या कामातून आनंद मिळेल. आवडणाऱया वस्तूंची खरेदी होईल. कामाच्या ठिकाणी सौहार्दपूर्ण संबंध प्रस्थापित कराल. त्यामुळे चांगल्या व्यक्तीची साथ लाभेल. बदामी रंग जवळ बाळगा. शुभ आहार…कोणताही मिताहार

वृश्चिक – सतर्क राहा

कोणत्याही बाबतीत तुमचा दृष्टीकोन अत्यंत सुस्पष्ट आणि स्वच्छ ठेवा. त्यामुळे बरेच प्रश्न मार्गी लागतील. गोंधळ आणि नैराश्य टाळा. चुकीच्या माहितीपास्डून सावध राहा. दिशाभूल होण्याची शक्यता. सतर्क राहा. शिवाची उपासना करा. पांढरा रंग महत्त्वाचा. शुभ आहार…दूध, पंचामृत

धनू – कामाशी काम

कार्यालयातील रिकामटेकडय़ा चर्चेपासून काहीसे दूरच राहा. कामाशी काम ठेवा. जोडीदारासमवेत होणारे मतभेद टाळता येतील. थोडय़ा समजूतदारपणाची गरज आहे. दोघांच्या सामंजस्याने बरेच जटील प्रश्न सोडवाल. जे तुमच्या कुटुंबाच्या दृष्टीने फायदेशीर असतील. हिरवा रंग जवळ बाळगा.शुभ आहार…साधा, सात्त्विक आहार

मकर – महत्त्वाचे निर्णय

 तुमचा खंबीर आणि निडर स्वभाव कौटुंबिक सौख्यासाठी खूप महत्त्वाचा ठरेल. काही महत्त्वाचे निर्णय घ्याल. त्यामध्ये सगळ्यांचेच हित असेल. त्यामुळे घरी तुम्ही केंद्रस्थानी राहाल. चांगल्या हवेचा सकारात्मक परिणाम प्रकृतीवर होईल. पिस्ता रंग जवळ बाळगा. शुभ आहार…चणे, गूळ

कुंभ – प्रसन्नता लाभेल

साचलेली घरगुती कामे पूर्ण केल्याने मनास समाधान लाभेल. सात्त्विक आहार प्रसन्नतेत भर घालेल. जुने मित्र भेटतील. त्यांच्यासोबत वेळ मजेत जाईल. संबंध अजूनच दृढ होतील. अनेक टप्प्यांवर यश मिळेल. पण मन अस्वस्थ असेल. आत्मशोध घ्या. मोरपिशी रंग जवळ बाळगा. शुभ आहार…उसळ, डाळी

मीन – ऊर्जेचा संचार

नव्या गोष्टी आत्मसात कराल. मनात उर्जेचा संचार होईल. त्यामुळे अवघड गोष्टी अगदी सोप्या वाटून त्या सहज पारही पाडाल. देवीची आणि मारुतीची उपासना करा. मनातील सकारात्मकता वाढेल. जांभळा रंग जवळ बाळगा. बचत करा. पुढे उपयोग होईल. शुभ आहार…आहार नियमन करा.