अंतराळवीर १६ वेळा साजरे करणार नववर्ष


सामना ऑनलाईन । वॉशिंग्टन

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी प्रत्येक जण वेगवेगळे बेत आखत असतो. आपला प्लॅन इतरांपेक्षा वेगळाच असला पाहिजे असा सगळ्यांचा आग्रह असतो. कितीही जय्यत तयारी केली असली तरीही नवीन वर्ष हे आपल्याला एकदाच साजरे करायला मिळते. पण यावर्षी नासाच्या काही अंतराळवीरांना अनोखी संधी मिळणार आहे. या अंतराळवीरांना एकदा दोनदा नव्हे तर तब्बल सोळा वेळा नववर्ष साजरे करायला मिळणार आहे.

एक्स्पडिशन ४२ या अंतराळयानातून हे अंतराळवीर उड्डाण करणार असून ४०२ किमी उंचीवर हा अवकाशतळ आहे. हे अंतराळयान दर ९० मिनिटाला पृथ्वीची प्रदक्षिणा करणार आहे. या अंतराळयानात अमेरिका, जपान, रशिया यांसारख्या विविध अंतराळवीरांचा समावेश असून त्यांना सरत्या वर्षाचा सूर्यास्त आणि नववर्षाचा सूर्योदय एकाच दिवसात सोळा वेळ पाहता येणार आहे. नासाच्या या सर्व अंतराळवीरांसाठी अविस्मरणीय अनुभव असणार असून शिवाय नासासाठीही अनोखी पर्वणी ठरणार आहे.